शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात कामकाज हवे

By admin | Published: November 26, 2015 12:02 AM

आर्थिक सुधारणांसाठी अत्यावश्यक असलेले वस्तू व सेवा कर विधेयक तसेच अन्य विधेयके मंजूर करवून घेण्याची सरकारला घाई आहे.

नवी दिल्ली : आर्थिक सुधारणांसाठी अत्यावश्यक असलेले वस्तू व सेवा कर विधेयक तसेच अन्य विधेयके मंजूर करवून घेण्याची सरकारला घाई आहे. राहुल गांधींच्या आक्रमक पवित्र्यामुळे सरकारच्या अडचणी मात्र वाढल्या आहेत. बिहार निवडणुकीच्या ताज्या निकालांमुळे सरकारइतकाच विरोधकांवरही कामकाज सुरळीत चालवण्याचा दबाव आहे.संपूर्ण मान्सून अधिवेशन कामकाजाविना वाया गेले. सरकारला अपेक्षित विधेयके त्यात मंजूर होऊ शकली नाहीत. किमान हिवाळी अधिवेशनात त्याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी सरकारने कसोशीचे प्रयत्न चालवले आहेत. राज्यसभेत सरकारकडे बहुमत नाही. विरोधकांच्या सहकार्याशिवाय कोणतेही महत्वाचे विधेयक राज्यसभेत मंजूर होण्याची शक्यता नाही. याची जाणीव ठेवून सत्ताधारी नेत्यांनी विरोधकांबाबत यंदा काहीसे नरमाईचे धोरण अवलंबले आहे. सरकारच्या अग्रक्रमानुसार वस्तू व सेवा कर विधेयकाला संसदेची मंजुरी सर्वाधिक महत्वाची आहे. याखेरीज सरकारने दरम्यानच्या काळात धनादेशांच्या अनादराच्या केसेससंबंधी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट दुरूस्ती अध्यादेश तसेच हायकोर्टात वाणिज्य पीठ व वाणिज्य अपिलेट विभाग तयार करण्यासाठी एक अध्यादेश जारी केला. त्यांची विधेयके अधिवेशनात मंजुरीसाठी मांडली जातील. लोकसभेत ८ आणि राज्यसभेत ११ विधेयके प्रलंबित आहेत. यापैकी बहुचर्चित भू संपादन विधेयकाबाबत सरकार तूर्त तरी फारसे आग्रही दिसत नाही. काँग्रेसच्या गोटातून ध्वनित होणाऱ्या संकेतानुसार हिवाळी अधिवेशनात काही महत्वाच्या दुरूस्त्यांसह वस्तू व सेवा कर विधेयक मंजूर होण्याची आशा वाटते आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)