तुळशीत सकारात्मक बदल झाला
By admin | Published: February 20, 2016 2:01 AM
माढा तालुक्यातील तुळशी गावाचा समावेश खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी संसद आदर्श ग्राममध्ये केल्यापासून गावामध्ये जागरुकता आली आहे. गावात सकारात्मक बदल झाला आहे. या योजनेतून 10 कोटींचा आराखडा तयार केला असून एक कोटीच्यावर कामे झाली आहेत. आमदार बबनदादा शिंदे यांच्या फंडातून हायमास्ट दिवा बसवण्यात आला आहे. तसेच साठवण तलाव व सिमेंट बंधारे बांधले आहेत. साठवण तलावातील गाळ लोकसहभागातून काढण्यात आला आहे. मोहरम हा गावाचा पारंपरिक उत्सव असून हा उत्सव म्हणजे हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक आहे. पाणीपुरवठय़ासाठी व्होळे 28 गाव योजनेतून पाणी आणले असून सध्या पाणी समस्या सुटली आहे. सौर दिवा बसवण्यात आला आहे. गावातील रस्ते सिमेंटचे केले आहेत. नव्याने 150 घरकुले मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.
माढा तालुक्यातील तुळशी गावाचा समावेश खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी संसद आदर्श ग्राममध्ये केल्यापासून गावामध्ये जागरुकता आली आहे. गावात सकारात्मक बदल झाला आहे. या योजनेतून 10 कोटींचा आराखडा तयार केला असून एक कोटीच्यावर कामे झाली आहेत. आमदार बबनदादा शिंदे यांच्या फंडातून हायमास्ट दिवा बसवण्यात आला आहे. तसेच साठवण तलाव व सिमेंट बंधारे बांधले आहेत. साठवण तलावातील गाळ लोकसहभागातून काढण्यात आला आहे. मोहरम हा गावाचा पारंपरिक उत्सव असून हा उत्सव म्हणजे हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक आहे. पाणीपुरवठय़ासाठी व्होळे 28 गाव योजनेतून पाणी आणले असून सध्या पाणी समस्या सुटली आहे. सौर दिवा बसवण्यात आला आहे. गावातील रस्ते सिमेंटचे केले आहेत. नव्याने 150 घरकुले मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. गाव 80 टक्के हागणदारीमुक्त आहे. 100 टक्के करण्याच्यादृष्टीने वाटचाल सुरू आहे. गावची प्राथमिक शाळा ही आदर्श असून तिला आयएसओ हे मानांकन मिळाले आहे. जलयुक्त शिवार अभियानातून जलसंधारणाची कामे झाली असून आणखी सुरू आहेत. गावाला कसलीही बँक नाही किंवा एटीएम नाही, ही आमची गैरसोय आहे. परिसरात 14 बंधार्यांची मागणी केली असून दोन पूर्ण झाले आहेत. कोटहागणदारीमुक्त व जलयुक्त गाव करण्याचा विडा गावकर्यांनी उचलला आहे. तो पूर्ण करणे आणि महिला बचत गटांना अधिक बळ देणे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सरपंच कांताबाई दगडे