नवी दिल्ली : सातव्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोल्समध्ये एनडीएला ३६१-४०१, तर इंडियाला १३१ ते १६६ जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अनेक राज्यांत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळत आहे, तर काही राज्यांत एनडीएला अपेक्षित यश मिळत नसल्याचेही दिसत आहे; परंतु आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगणा, पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर होताना दिसत आहे.
वायएसआरचे पानिपतएकूण २५ जागा असलेल्या आंध्र प्रदेशमध्ये सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला मोठा धक्का बसत आहे. टीडीपी, भाजप व जनसेना यांच्या एनडीएला २१ जागा मिळत आहेत.वायएसआरला २ ते ४ जागा मिळत असून, इंडिया आघाडी भोपळाही फोडू शकणार नाही.
बीजेडीला मोठा धक्का ओडिशात सत्ताधारी बीजेडीला धूळ चारत यंदा भाजप सर्वांत मोठा पक्ष म्हणून पुढे येताना दिसत आहे. भाजपला तब्बल १८-२० जागा मिळण्याचा अंदाज आहे. बीजेडी केवळ २ जागा जिंकेल. २०१९ मध्ये बीजेडीला १२ जागा मिळाल्या होत्या, तर भाजपला ८ जागा मिळाल्या होत्या.
काँग्रेसचा दणकासत्तेत असलेल्या काँग्रेसला मोठा फटका बसत आहे. काँग्रेस व बीआरएसचा गड भेदत भाजपला ११ ते १२ जागा मिळताहेत. २०१९ मध्ये ९ जागा जिंकणाऱ्या बीआरएसला १ जागा मिळत आहे. ओवैसींचा एमआयएमही एखाद्या जागेपर्यंत मर्यादित राहू शकतो.
ममता बॅनर्जींना धक्कास्वतंत्र लढणाऱ्या तृणमूलला यंदा मोठा धक्का बसणार आहे. २०१९ मध्ये २२ जागा जिंकणारी तृणमूल ११ ते १४ जागांपर्यंत मर्यादित राहील. भाजप ४६ टक्के मतांसह ४२ पैकी २६ ते ३१ जागा मिळत आहेत, काँग्रेस व डाव्यांच्या आघाडीला केवळ ०-२ जागा मिळू शकते.