शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना आजपासून; खेळपट्टी ठरवणार कसोटी मालिकेचे भवितव्य
2
आजचे राशीभविष्य : प्रवास किंवा सहलीची शक्यता, आज काही आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता
3
राज'पुत्रा'समोर दोन्ही सेनेचे आव्हान; अमित ठाकरेंची माहीममधील लढत रंगतदार होणार!
4
फॉर्म्युल्यात ८५चे समान 'चित्र'! प्रत्यक्षात काँग्रेस १०३, उद्धवसेना ९४, शरद पवार गट ८४!
5
धनत्रयोदशीला धनवर्षाव: ९ राजयोग, ९ राशींवर लक्ष्मी प्रसन्न; ऐश्वर्य, वैभवाचे वरदान, शुभ-लाभ!
6
"प्रथमच स्वतःसाठी मागतेय मते"; प्रियांका गांधी यांनी वायनाड मधून भरला उमेदवारी अर्ज
7
गुरुपुष्य योग: स्वामी महाराजांच्या पूजेनंतर आवर्जून म्हणा प्रदक्षिणा अन् आरती गुरुवारची
8
ताशी १२० किमीने धडकणार 'दाना' चक्रीवादळ; पावसाला सुरुवात, ३५० रेल्वे रद्द
9
विधानसभा निवडणूक: ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघांत 'काँटे की टक्कर'ची शक्यता
10
परस्परांविरोधात प्रचार करणार? संदीप नाईक यांच्या उमेदवारीमुळे गणेश नाईकांपुढे पेच
11
ठाणे मतदारसंघात शिंदेसेनेची भाजपच्या विरोधात बंडखोरी; पाचपाखाडी मतदारसंघावर दावा
12
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
13
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
14
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
15
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
16
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
17
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
18
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
19
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
20
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?

Odisha Railway Accident : देशभरातील सिग्नल यंत्रणेचं होणार ऑडिट, अपघातानंतर रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2023 8:07 AM

बालासोर रेल्वे अपघातानंतर रेल्वेकडून मोठी पावलं उचलण्यात येत आहेत.

बालासोर रेल्वे अपघातात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर अनेक जण यात जखमीही झाले आहेत. या अपघातानंतर आता रेल्वेकडून मोठी पावलं उचलण्यात येत आहेत. सीबीआय चौकशीची शिफारस केल्यानंतर, रेल्वे मंत्रालयानं आता देशभरातील सिग्नलिंग सिस्टमचं ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे बोर्डाने सर्व महाव्यवस्थापकांना आठवडाभरात चौकशी करून १४ जूनपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. जेव्हा देशभरात तपास केला जाईल तेव्हा १० टक्के ठिकाणावर वरिष्ठ अधिकारी पुन्हा तपास करतील. याद्वारे सिग्नल यंत्रणा योग्यरित्या कार्यरत आहे का नाही हे तपासलं जाईल. याशिवाय रेल्वे स्थानकांवर लावण्यात आलेल्या हाऊसिंग सिग्नलिंग उपकरणांचा तपास करण्याचेही आदेश देण्यात आलेत.

रेल्वे अपघातात आई-वडिलांचं छत्र हरपलेल्या मुलांसाठी 'वीरू'चा मदतीचा हात, केली मोठी घोषणा

याशिवाय, रिले रूमची तपासणी केल्यानंतर, दुहेरी सिग्नलिंग यंत्रणा योग्यरित्या कार्यरत आहे का नाही हे पाहिलं जाईल. सिग्नलिंग सिस्टम रिले रूममधूनच नियंत्रित केली जाते. दुसरीकडे, सोमवारी रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी अपघातातील जखमी चालक आणि त्याच्या सहाय्यकांचे जबाब नोंदवले. दोघांवर एम्स-भुवनेश्वरमध्ये उपचार सुरू आहेत. या अपघाताप्रकरणी रेल्वे कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे या अपघातात मृत्यू झालेल्यांपैकी १७० जणांची ओळख पटली आहे.

सीबीआय तपासाची मागणीबालासोरमध्ये तीन रेल्वेगाड्यांच्या अपघातात २७५ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात कोण कर्मचारी दोषी आहेत, हे अद्याप निश्चित केलेलं नाही. सदर अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची मागणी रेल्वे खात्यानं केली होती. गाड्या कोणत्या ठिकाणी आहेत, याची माहिती देणाऱ्या इंटरलॉकिंग यंत्रणेत छेडछाड केली असावी, असा संशय रेल्वेनं व्यक्त केला आहे.

...म्हणून तपास दिला सीबीआयकडे रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेशी कोणीतरी छेडछाड केली असावी. त्यामुळेच ओडिशामध्ये भीषण रेल्वे अपघात घडला, असा प्राथमिक तपासाचा निष्कर्ष आहे. त्यामुळेच या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपविण्यात आली, असे केंद्र सरकारच्या सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :Odisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघातrailwayरेल्वेCBIगुन्हा अन्वेषण विभाग