शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
4
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
5
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
6
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
7
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
8
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
9
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
11
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
12
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
15
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
16
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
17
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
18
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
19
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड

'मोदी तोडणार काँग्रेसचा रेकॉर्ड, 2047पर्यंत राहणार देशात भाजपाची सत्ता'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2019 9:42 AM

लोकसभा निवडणूक 2019मध्ये भाजपानं देदीप्यमान विजय मिळवला आहे.

आगरताळाः लोकसभा निवडणूक 2019मध्ये भाजपानं देदीप्यमान विजय मिळवला आहे. या विजयामुळेच पक्षाच्या नेत्यांचाही आत्मविश्वास दुणावला आहे. भाजपाचे महासचिव राम माधव यांनी शुक्रवारी पार्टीच्या एका कार्यक्रमात मोठा दावा केला आहे. भाजपा 2047पर्यंत देशातली सत्ता काबीज करेल. तसेच सर्वाधिक काळ सत्ता उपभोगलेल्या काँग्रेसचा रेकॉर्ड भाजपा तोडेल, असंही ते म्हणाले आहेत. भाजपाचे महासचिव राम माधव शुक्रवारी त्रिपुरामध्ये म्हणाले, जर कोणता पक्ष सर्वाधिक काळ सत्तेत राहिला असेल तर तो काँग्रेस आहे. काँग्रेसनं 1950 ते 1977पर्यंत देशात सत्ता गाजवली. मी तुम्हाला विश्वासानं सांगू शकतो की, मोदी हा रेकॉर्ड तोडतील. 2047ला स्वातंत्र्याचं 100वे वर्षं भारत साजरा करेल, तोपर्यंत देशात भाजपाची सत्ता राहील, असंही राम माधव म्हणाले आहेत. लोकसभा निवडणुकीत आगरताळा, त्रिपुरातल्या दोन्ही जागा भाजपानं जिंकल्यानंतर आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम ठेवला होता.या कार्यक्रमात त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव, राष्ट्रीय महासचिव राम माधवसह इतर नेतेही सहभागी होते. यावेळी भाजपाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजय राहटकर म्हणाल्या, लोकसभा निवडणुकीतला हा विजय म्हणजे पूर्णविराम नाही. ही तर सुरुवात आहे, अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी