नवी दिल्ली : वाहन चालक व वाहनातील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मोटर वाहन कायद्यांत मोठे व अनेक बदल केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी प्रसार माध्यमांना दिली.वर्धा जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात वैद्यकीय शिक्षण घेणारे ७ विद्यार्थी एकाच वेळी मरण पावल्याच्या घटनेने मोटार वाहन कायद्यातील त्रुटींचा नव्याने फेरविचार करण्याची आवश्यकता असल्याचे सांगून गडकरी म्हणाले, सध्या केवळ वाहन चालक व चालकाच्या बाजूच्या प्रवाशाला एअर बॅगमुळे सुरक्षा मिळते.
कायद्यातील प्रमुख बदल -- मोटर गाडीतील सर्व प्रवाशांना सीट बेल्ट अनिवार्य- आठ आसनी वाहनापर्यंत सर्व प्रवाशांना एअर बॅग सक्तीचे राहील.- सर्व वाहनांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्टार मानांकन दिले जाईल.- वाहनांच्या हॉर्नच्या आवाजावर नियंत्रण आणणार. - सर्व वाहनांमध्ये ब्रेकसंदर्भात एबीएस प्रणाली राहील.- दिव्यांग व्यक्तींसाठी वाहनांच्या रचनेमध्ये बदल केले जातील.- चालकाला डुलकी येत असल्यास वाहनातील अलार्म सुरू होईल.- नियमित अपघात होणाऱ्या जागेवर वाहने गेल्यानंतर तेथे चालकाला धोक्याची सूचना दिली जाईल.