- एस. के. गुप्तानवी दिल्ली : काही विषयांच्या न झालेल्या परीक्षेच्या आधारावर तयार होत असलेल्या दहावी, बारावीच्या गुणपत्रिकेच्या रचनेत कोणत्याही प्रकारचे बदल केले जातनाहीत.ज्याप्रकारे विद्यार्थ्यांना मागील वर्षी गुणपत्रिका दिल्या जात होत्या. त्याचप्रकारे यावेळीही दिल्या जातील. सीबीएसईचे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी लोकमतसमवेत विशेष बातचीत करताना ही माहिती दिली. सीबीएसईचे निकाल १५ जुलैपूर्वी जाहीर होऊ शकतात.सीआईएससीईचे आज निकालकाऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (सीआयएससीई) सचिव गॅरी अराथून यांनी लोकमतला सांगितले की, सीआईएससीईचे दहावी-बारावीचे निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर करण्यात येणार आहेत. विद्यार्थी हे निकाल कॅरिअर पोर्टल व एसएमएसच्या माध्यमातून मिळवू शकतील. शाळांना याबाबत काही माहिती हवी असल्यास त्या काऊन्सिलच्या 18002671760 या हेल्पलाईन नंबरवर कॉल करू शकतात.
सीबीएसई गुणपत्रिकेत होणार नाही बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 4:34 AM