नवी दिल्ली -किर्गिस्तानमधील बिश्केक येथे होणाऱ्या शांघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीदरम्यान मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची भेट होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र मोदी आणि इम्रान यांच्यात कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नसल्याचे परराष्ट मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. मात्र या परिषदेत चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्याशी नरेंद्र मोदी यांची भेट होणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, एससीओ परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यात भेट होणार नाही. सद्यस्थितीत आम्ही एवढीच माहिती देऊ शकतो.''
SCO परिषदेत नरेंद्र मोदी-इम्रान खान यांच्यात भेट होणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 7:56 PM