शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

आमच्या सरकारमध्ये साधू कांड होणार नाही, वचन देतो; एकनाथ शिंदेंचा अयोध्येतून ठाकरेंवर बाण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2023 3:14 PM

राम अयोध्येत जन्मल्याचे जे पुरावे मागत होते, ते घरी बसलेत आणि रामाचे भक्त सत्तेत आलेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आमदारांसह अयोध्येचा दौरा केला. सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी देखील दिल्लीला जात असताना मध्येच अयोध्येत हजेरी लावली. यामुळे हा दौरा भाजपच्या आमदार, समर्थक आमदारांनाही करता आला. मुख्यमंत्री झाल्यानंतर मी पहिल्यांदाच अयोध्येला आल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. या वेळी राज ठाकरेंना आव्हान देणारे भाजपाचे बाहुबली खासदार बृजभूषण सिंह देखील उपस्थित होते. 

Eknath Shinde, Ravi Rana Ayodhya Visit: दौरा शिंदेंच्या शिवसेनेचा, रवी राणांनीच भाव खाल्ला; अयोध्येत नेमके काय घडलेय पहा...राम अयोध्येत जन्मल्याचे जे पुरावे मागत होते, ते घरी बसलेत आणि रामाचे भक्त सत्तेत आलेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. राम मंदिराचे स्वप्न आज पूर्ण होतेय. कार सेवक असतानाची अयोध्या मला आठवतेय. माझ्या डोळ्यासमोरून तरळतेय. आपण हयात असताना हे व्हावे असे वाटत होते. माझी खूप दिवसांपासूनची इच्छा होती. मुख्यमंत्री शिंदेंमुळे योग जुळून आला, असे फडणवीसांनी स्पष्ट केले. 

यानंतर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. लखनऊ ते अयोध्यात पूर्ण परिसर भगवामय झाला आहे.  मुख्यमंत्री झाल्यानंतर मी पहिल्यांदाच रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. माझे जे स्वागत झाले त्याचे मी आभार मानतो. मंदिर वही बनाएंगे, तारीख नही बताएंगे सर्व खोटे ठरविले. मोदींनी त्यांच्याच काळात मंदिराचे काम सुरु केले आहे. तारीखही सांगितली आहे. जे विचारत होते त्यांना घरचा रस्ता दाखविला आहे, अशी टीका शिंदे यांनी केली. 

Eknath Shinde Ayodhya Visit Live: राम मंदिराला जेवढे सागवान लागेल, महाराष्ट्र देणार; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणाहनुमान चालिसा वाचणाऱ्या खासदार नवनीत राणा, रवी राणा यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली तुरुंगात टाकले होते. हे पाप करणारे रावण की राम आहेत, हे सांगा, असा प्रश्न शिंदे यांनी उपस्थितांना विचारला. तेव्हा कार्यकर्त्यांमधून रावण असे उत्तर आले. साधुंचे हत्याकांड झाले तेव्हा हे चुप बसलेले. आमच्या सरकारमध्ये साधू कांड होणार नाही. आम्ही त्यांचे रक्षण करणार. महाराष्ट्रात आता प्रभू रामांच्या आशिर्वादाने बनलेले सरकार काम करणार आहे, असा मी विश्वास देतो, असे शिंदे म्हणाले.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAyodhyaअयोध्याDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे