नवी दिल्ली : मोबाईल ग्राहकांसाठी एसटीडी शुल्क रद्द करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही, असे स्पष्टीकरण केंद्र सरकारने संसदेत दिले. त्यामुळे मोबाईल फोन कॉलवरील एसटीडी शुल्क कायम राहणार हे स्पष्ट झाले आहे.दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले की, मोबाईल ग्राहकांसाठी एसटीडी शुल्क रद्द करण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या सरकारसमोर नाही. रविशंकर प्रसाद यांनी म्हटले की, एसटीडी शुल्क रद्द करून राष्ट्रीय रोमिंग मुक्त केल्यास मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या महसुलावर होणारा परिणाम अनेक घटकांवर अवलंबून असेल. कंपन्यांची दरांबाबतची लवचिकता, इनकमिंग आणि आऊट गोइंग कॉलची विलगता, सेवा खंडित करण्यासंबंधी आणि वहन संबंधीचे शुल्क या घटकांवर ते अवलंबून राहील. सरकारी मालकीच्या बीएसएनएलने मोफत इनकमिंग व्हाईस कॉल सुविधा सुरू केली आहे. प्रत्येक सेवादात्या कंपनीकडे रोमिंगच्या काळात मोफत इनकमिंग कॉलची सुविधा देणारा किमान एक तरी टेरिफ प्लॅन आहे.
मोबाईल फोन ग्राहकांसाठी एसटीडी शुल्क राहणारच
By admin | Published: December 09, 2015 11:36 PM