NDA आणि INDIA पासून वेगळे आहेत हे 11 पक्ष, काँग्रेसपेक्षा डबल खासदार; करू शकतात मोठा 'खेला'!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 08:36 PM2023-07-19T20:36:50+5:302023-07-19T20:38:37+5:30

महत्वाचे म्हणजे, या 11 पक्षांचे मिळून एकूण 91 खासदार आहेत...!

These 11 parties are aloof from NDA and INDIA, MPs are double than Congress | NDA आणि INDIA पासून वेगळे आहेत हे 11 पक्ष, काँग्रेसपेक्षा डबल खासदार; करू शकतात मोठा 'खेला'!

NDA आणि INDIA पासून वेगळे आहेत हे 11 पक्ष, काँग्रेसपेक्षा डबल खासदार; करू शकतात मोठा 'खेला'!

googlenewsNext

लोकसभानिवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर देशातील तब्बल 60 पक्ष 2 गटांत विभागले गेले आहेत. यापैकी सुमारे 38 पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सोबत आहेत, तर 26 पक्षांनी 'भारतीय राष्ट्रीय विकासात्मक सर्वसमावेशक आघाडी' (इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लूसिव्ह अलायन्स (INDIA)) निवडले आहे. मात्र यातच 11 पक्ष असे आहेत, जे अद्याप स्वतंत्र आहेत.

महत्वाचे म्हणजे, या 11 पक्षांचे मिळून एकूण 91 खासदार आहेत. एवढेच नाही, तर त्यांच्या राज्यांत त्यांचा दबदबाही आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि ओडिशातून लोकसभेवर एकूण 63 खासदार जातात. या तिन्ही राज्यांतील सत्ताधारी पक्ष, अनुक्रमे, वायएसआर काँग्रेस पार्टी, भारत राष्ट्र समिति (बीआरएस) आणि बीजू जनता दल (बीजद) हे या दोन्ही आघाड्यांपासून दूर आहेत.

काँग्रेस आणि 25 विरोधी पक्षांनी मंगळवारी बेंगळुरू येथे झालेल्या बैठकीत आपल्या आघाडीचे नाव ‘इंडिया’ (इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लूसिव्ह अलायन्स) ठेवले आहे. तर दुसरीकडे, मंगळवारीच भाजपच्या नेतृत्वाखाली NDA ची बैठक झाली. यात 38 पक्ष सहभागी झाले होते.

निवडणुकीची दिशा बदलण्याची क्षमता - 
वायएसआर काँग्रेस, बीआरएस आणि बीजद शिवाय बहुजन समाज पार्टी (बसपा) हा देखील एक असा महत्वाचा पक्ष आहे, जो तटस्थ आहे. बसपा उत्तर प्रदेशातील एक महत्वाचा पक्ष आहे आणि इतरही काही राज्यांमध्ये त्यांची उपस्थिती आहे. तो देखील एक राष्ट्रीय पक्ष असून, लोकसभेत त्यांचे 9 खासदार आहेत.

यांच्याशिवाय, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम), तेलुगु देसम पार्टी (तेदेपा), शिरोमणी अकाली दल (शिअद), ऑल इंडिया यूनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट (एआययूडीएफ), जनता दल (सेक्युलर), राष्ट्रीय लोकशाही पार्टी आणि शिरोमणी अकाली दल (मान) हेदेखील अद्याप कुठल्याही आघाडीचा भाग नाहीत. यांपैकी, वायएसआर काँग्रेस आणि बीजदने अधिक वेळा संसदेत सत्ताधारी पक्षाच्या बाजूने मतदान केले आहे. 

Web Title: These 11 parties are aloof from NDA and INDIA, MPs are double than Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.