शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"
2
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
3
देवेंद्र जी, आप भी चुनाव लड रहे है... मोदींनी नाव घेताच देवेंद्र फडणवीस धावत आले, धुळ्यातील सभेत काय घडलं?
4
SA vs IND : ऋतुराज गायकवाडला पुन्हा का वगळलं? भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचं मोठं विधान
5
ट्रम्प यांची एक घोषणा आणि Waaree Energies Shares आपटले; २ दिवसांत १०% ची घसरण
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
7
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
8
Wipro ला मिळाल्या २ ब्लॉक डील्स; ८.५ कोटी शेअर्सचं ट्रान्झॅक्शन; शेअर्सवर काय परिमाम होणार?
9
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
10
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...
11
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
12
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
13
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
14
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
15
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
16
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
17
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
18
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
19
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
20
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा

हे 5 मुद्दे, नरेंद्र मोदी यांच्यासाठी ठरु शकतात डोकेदुखी  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 1:18 PM

2014 च्या निवडणुकीत मोदी लाटेत भाजपचे अनेक खासदार निवडून आले मात्र आता अशी परिस्थिती नाही याची जाणीव भाजपला देखील आहे. 

नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी देशात सर्व राजकीय पक्षांशी तयारी अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस या सारख्या पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी घोषित केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत कोण बाजी पटकवणार याचीच चर्चा सगळीकडे सुरु आहे. मात्र लोकसभा निवडणूक भारतीय जनता पार्टीसाठी सोपी नसेल त्यामुळे भाजप निवडणुकीत कोणताही धोका पत्करण्यासाठी तयार नाही. 

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या सहकारी पक्षांनी युपीएला सत्तेच्या बाहेरचा रस्ता दाखवला होता. भारतीय जनता पार्टीला या निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळालं होतं. त्यावेळी देशभरात नरेंद्र मोदी यांच्या नावाची लाट निर्माण होती. या लाटेत भाजपचे अनेक खासदार निवडून आले मात्र आता अशी परिस्थिती नाही याची जाणीव भाजपला देखील आहे. 

उमेदवार निवडीपासून प्रचार यंत्रणेपर्यंत, सभांपासून रॅलीपर्यंत सर्वच बाबी भारतीय जनता पार्टी नियोजनबध्द पद्धतीने करत आहे. मात्र निवडणुकीत असे काही मुद्दे आहे जे नरेंद्र मोदी यांच्यासाठी डोकेदुखी ठरु शकतात 

1- राफेलवरुन रणकंदन काँग्रेसकडून राफेल विमान खरेदीचा मुद्दा निवडणुकीसाठी कळीचा मुद्दा ठरु शकतो, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी निवडणुकीमध्ये आक्रमकरित्या राफेल मुद्दा मांडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट लक्ष्य केले आहे. राफेल विमान खरेदीमध्ये घोटाळा झाला असून पंतप्रधान यांनी राफेल करारातून अनिल अंबानी यांचे खिसे भरण्याचं काम केले असा आरोप मोदींवर होत आहे. विमान बनविण्याचे कोणतंही ज्ञान आणि अनुभव नसताना मोदी सरकारने अनिल अंबानी यांच्या कंपनीला फायदा होईल म्हणून हे कंत्राट दिले. 30 हजार कोटी रुपये अनिल अंबानी यांच्या खिशात घातले, चौकीदाराने देशाला लुटले असा आरोप करत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी केली. 

2 - नोटाबंदी आणि जीएसटी  देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी मुख्यत: काळा पैसा आणि दहशतवाद संपविण्यासाठी मोदी सरकारने नोटाबंदी आणि जीएसटी असे ऐतिहासिक निर्णय घेतले. नोटाबंदीने काळा पैशाला चाप बसला आणि जीएसटीमुळे करप्रणालीमध्ये सुलभता आली असा दावा भाजपकडून करण्यात येतो. मात्र विरोधकांनी नोटबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली, जीएसटीमुळे छोटे व्यापारी देशोधडीला लागले असा आरोप केला. 

3 - कर्जबुडवे उद्योगपती विजय माल्ल्या आणि नीरव मोदी यांच्यासारख्या उद्योजकांनी देशातील बॅंकांना लुटून परदेशात पळून गेले. बॅकांचे कर्ज बुडवून उद्योगपती परदेशात पळून गेले हे मोदी सरकारचे अपयश आहे. नीरव मोदी आणि विजय माल्ल्या पळून जाण्यामागे भाजपमधील मंत्र्यांचा हात आहे असा आरोपही काँग्रेसने केला आहे. 

4 - शेतकरी आणि बेरोजगारी नरेंद्र मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध योजना जाहीर केल्याचा दावा भाजपकडून केला जात असला तरी पिकांचा हमीभाव, शेतकरी कर्जमाफी आणि नोटाबंदीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, देशात बेरोजगारी वाढली अशा विरोधकांच्या मुद्द्यावरून विरोधक निवडणुकीच्या काळात आक्रमक होणार आहेत. 

5- विरोधी पक्षांची महाआघाडी विविध राज्यांमध्ये भाजपविरोधी पक्षांची आघाडी होत आहे. नरेंद्र मोदी यांच्या विरोधात ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू, शरद पवार, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल, मायावती, अखिलेश यादव यांच्या सारखे विविध पक्ष भाजपच्या विरोधात एकत्र येऊन महाआघाडी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. उत्तर प्रदेशात एकमेकांचे कट्टर वैरी असलेले सपा-बसपा यांनी आघाडी केल्याने उत्तर प्रदेशात त्याचा फटका भाजपला मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता वर्तवली जातेय. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElectionनिवडणूकRafale Dealराफेल डीलDemonetisationनिश्चलनीकरणFarmerशेतकरीGSTजीएसटीcongressकाँग्रेस