ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - सध्याचा काळ 4 जीचा असल्यामुळे तुमच्याकडे असणा-या मोबाईल फोनमध्ये सुद्धा 4 जी असणे अनिवार्य बनलं आहे. त्यामुळे तुम्हाला अगदी तुमच्या बजेटमध्ये बसतील असे काही स्मार्टफोन बाजारात आहेत. मात्र, या फोनबाबत आपल्याला माहिती नसते.
यासाठीच खास आम्ही आपल्यासाठी काही फोनची माहिती देत आहोत. त्याची किंमत बाजारात अगदी पाच हजार रुपयांपेक्षा खाली आहे. आणि खासकरुन यामध्ये 4 जी आहे. असेच काही 4 जी सपोर्ट करणारे अँड्रॅाईड फोन आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.
पाच हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीतील 4 जी फोन खालील प्रमाणे....
स्वाइप कनेक्ट - हा फोन 4 जी असून यामध्ये 512 एमबी रॅम आहे. स्क्रीन साईज 4 इंच एफडब्लूव्हीजी आणि इंटरनल 8जीबी मेमरी आहे. तसेच, 5 मेगापिक्सल रियर-कॅमेरा आणि एलईडी फ्लॅशसह 1.3 मेगापिक्सल फ्रंटकॅमेरा आहे.
झेन अॅडमायर थ्रील - या फोनमध्ये 1.3GHz quad-core प्रोसेसरसह 1 जीबी रॅम आहे. अँड्रॅाईड 6.0 मार्शमैलो ऑपरेटिंग सिस्टिम आणि फिचर्स आहेत. तसेच, या फोनची साईज 4.5 इंच आहे. 5 मेगापिक्सल रियर-कॅमेरा आणि फ्रंटकॅमेरा 2 मेगापिक्सल आहे. बॅटरी -1,750 mah इतकी आहे.
मायक्रोमॅक्स Vdeo 1 - मायक्रोमॅक्सचा कमी किंमती असलेला हा 4 जी फोन. यामध्ये 1 जीबी रॅम, 8 जीबी इंटरनल मेमरी आणि अँड्रॅाईड 6.0 मार्शमैलो ऑपरेटिंग सिस्टिम आहे. तसेच 5 मेगापिक्सल रियर-कॅमेरा आणि फ्रंटकॅमेरा 5 मेगापिक्सल आहे. तर बॅटरी -1,800mAh इतकी आहे.
मायक्रोमॅक्स कॅनव्हास स्पार्क - या फोनचा डिसप्ले 5 इंच एफडब्लूव्हीजीए आहे. 1.3GHz quad-core Spreadtrum प्रोसेसरसह 1 जी रॅम आहे. इंटरनल स्टोरेज 8 जीबी आहे. तसेच 32 जीबीपर्यंत मेमरी कार्ड टाकू शकता. 5 मेगापिक्सल रियर-कॅमेरासह एलईजी फ्लॅश आणि फ्रंटकॅमेरा 5 मेगापिक्सल आहे. तर बॅटरी 2,000 mAh इतकी आहे.
रिलायन्स Lyf Wind 7i - रिलायन्स जिओचा हा सर्वसामान्यांना परवडणारा फोन आहे. हा फोन 5 इंच एचडी स्क्रीनचा आहे. यामध्ये quad-core Qualcomm Snapdragon 210 प्रोसेरर आणि 1 जीबी रॅम आहे. तर अँड्रॅाईड 6.0 मार्शमैलो ऑपरेटिंग सिस्टिम आहे. 8 मेगापिक्सल रियर-कॅमेरा आणि फ्रंटकॅमेरा 5 मेगापिक्सल आहे. तर बॅटरी 2,250 mAh इतकी आहे.
झोलो ईरा 2 - या फोनचा डिसप्ले 5 इंच इतका आहे. 1.3GHz quad-core प्रोसेसर आणि 1 जीबी रॅम आहे. तर अँड्रॅाईड 6.0 मार्शमैलो ऑपरेटिंग सिस्टिम आहे. 1 जीबी रॅम आमि 8 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. 5 मेगापिक्सल रियर-कॅमेरा आणि फ्रंटकॅमेरा आहे. तर बॅटरी 2,350 mAh इतकी आहे.
इंटेक्स अक्वा एस 2 - इंटेक्सचा हा सर्वात स्वस्त 4 जी फोन आहे. या फोनचा डिसप्ले 5 इंच इतका आहे. 1.2GHz quad-core Spredtrum प्रोसेसर आहे. तर अँड्रॅाईड 6.0 मार्शमैलो ऑपरेटिंग सिस्टिम आहे. 1 जीबी रॅम आमि 8 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. 5 मेगापिक्सल रियर-कॅमेरा आणि फ्रंटकॅमेरा आहे.
अलकाटेल पिक्सी 4 (5) - या फोनचं नाव इतकं चर्चेत नसलं तरीही हा फोन 4 जी असून आपल्यासाठी कमी बजेटमध्ये उपलब्ध आहे. याचा डिसप्ले डिसप्ले 5 इंच इतका आहे. 1GHz quad-core MediaTek प्रोसेसर आहे. तर अँड्रॅाईड 6.0 मार्शमैलो ऑपरेटिंग सिस्टिम आहे. 1 जीबी रॅम आमि 8 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. 8 मेगापिक्सल रियर-कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल फ्रंटकॅमेरा आहे. 2,000 mAh इतकी बॅटरी आहे.
स्वाइप इलाइट 2 प्लस - 4जी VoLTE फोन असलेला हा स्वस्तातला फोन आहे. यामध्ये 1 जीबी रॅम आणि 8 जी रोम आहे. ऑपरेटिंग सिस्टिम अँड्रॅाईड 5.1 लॉलीपॉप आणि फिचर्स आहे. 5 मेगापिक्सल रियर-कॅमेरा आणि 2 मेगापिक्सल फ्रंटकॅमेरा आहे. 2,500 mAh इतकी बॅटरी आहे.
इंटेक्स अक्वा क्लासिक 2 - या फोनची ऑपरेटिंग सिस्टिम अँड्रॅाईड 6.0 मार्शमैलो आहे. तर 5 इंच डिसप्ले आहे. 1 जीबी रॅम आणि 8 जीबी इंटरनल स्टोरेज मेमरी आहे. तसेच या फोनचा 5 मेगापिक्सल सेकन्डरी कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल फ्रंटकॅमेरा आहे. 2,200mAh इतकी बॅटरी आहे.