शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
3
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
4
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

देशातील सर्वात मोठ्या एक्स्प्रेस वेवर 'या' खास सुविधा मिळणार, पहिला टप्पा 12 फेब्रुवारीपासून सुरू होणार! 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2023 11:48 AM

largest expressway of india : एक्स्प्रेस वेवर प्रत्येक किलोमीटरवर हाय क्वालिटीची (PTZ) कॅमेरा सिस्टिम बसवली आहे.

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठ्या दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेचा पहिला टप्पा दिल्ली ते दौसा 12 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. दिल्ली ते दौसा हा टप्पा लालसोटपर्यंत (बड का पाडा) 228 किमी असणार आहे. नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी डौला इंटरचेंज येथे 3 अतिरिक्त हेलिपॅड बांधले जात आहेत. त्यानंतर एक्स्प्रेस वे सुरू होताच जयपूर-दिल्ली प्रवास 3 तासांत होईल. सध्या लोकांना साडेपाच ते सहा तास लागतात.

मनी-9 च्या रिपोर्टनुसार, जयपूर ते दौसा इंटरचेंजला एक तास लागेल, तर दौसाहून एक्स्प्रेस वेवर आल्यानंतर दिल्लीचा प्रवास सुमारे अडीच तासांत पूर्ण होईल. या एक्स्प्रेस वेवर खासगी वाहनांचा कमाल स्पीड 120 किमी आहे. एनएचएआय (NHAI) हा एक्स्प्रेस वे दौसा (द्वारपुरा श्याम सिंग पुरा चॅनेज 168-550) पासून 10 किमी पुढे थेट जयपूर रिंग रोड आग्रा रोडला जोडला जाणार आहे.

दरम्यान, प्रत्येक 50 किमी अंतरावर रेस्ट एरिया देण्यात आले आहे. यामध्ये लहान मुलांसाठी आणि अपघाताच्या स्थितीत अत्याधुनिक फिडिंग एरिया देखील आहेत. पार्क ट्रॉमा सेंटरमध्ये खेळण्यासाठी स्वतंत्र पुरुष आणि महिला वॉर्ड आहेत. प्रत्येक 8 ते 10 खाटांच्या वॉर्डात 3-3 एसी आहेत. स्वच्छतेसाठी 24 तास सफाई कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. एक्स्प्रेस वेवर प्रत्येक किलोमीटरवर हाय क्वालिटीची (PTZ) कॅमेरा सिस्टिम बसवली आहे. कॅमेरा 360 डिग्री मूव्हमेंट करताना प्रत्येक वाहनावर लक्ष ठेवेल.

'या' गोष्टी महत्त्वाच्या...- अपघात किंवा वाहतूक कोंडी झाल्यास कॅमेरा कंट्रोल रूममध्ये अलर्ट देण्यात येईल. त्यानंतर तात्काळ रिप्सान्स टीम पोहोचेल.- एक्स्प्रेस वेवर वाहन थांबले किंवा एखादी व्यक्ती रस्त्यावर येते, तेव्हा बजर वाजेल.- खराब हवामान, धुके जाम किंवा वळवण्याच्या बाबतीत एक्स्प्रेस वेच्या मोठ्या स्क्रीनवर मेसेज दिसून येतील.- अशा स्थितीसाठी प्रत्येक 50 किमी अंतरावर रेस्ट एरिया देण्यात आली आहे.- वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास ई-चलन कापले जाईल आणि चलनचा मेसेज तुमच्या मोबाईलवर पाठवला जाईल.

इंटरचेंजवर कापला जाईल टोल सोहना (दिल्ली) प्रकल्प संचालक मुदित गर्ग यांचे म्हणणे आहे की,  या एक्स्प्रेस वेवर प्रति किमी 2.20 रुपये टोल आकारला जाईल. मात्र या एक्स्प्रेस वेवर कोणताही टोलनाका असणार नाही. तुम्ही ज्या इंटरचेंजमध्ये उतराल तेथे किमीनुसार टोल वसूल केला जाईल. या एक्स्प्रेस वेवर वाहन चालवणे सोपे व्हावे, यासाठी एक्स्प्रेस वेच्याच चढ-उतारांवर टोलनाके उभारण्यात आले आहेत. जेणेकरून लोकांना जास्त त्रास होणार नाही.

टॅग्स :delhiदिल्लीMumbaiमुंबई