नवी दिल्ली - राज्यसभेत आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांच्याविरोधात निलंबनाचा प्रस्ताव मांडला जात आहे. सभागृहातील त्यांच्या वर्तनामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, राघव चढ्ढा यांनी राज्यसभा सभागृहातून निलंबनानंतर भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच, हे खूप ताकदवान लोकं आहेत, ते कुठल्याही थराला जाऊ शकतात, असे म्हणत थेट गंभीर आरोपही केले आहेत. माझी काहीही चूक नाही, मी कुणाच्याही खोट्या सह्या केल्या नाहीत. विशेष म्हणजे तुम्हाला केवळ खासदारांची नावे सुचवायची असतात, त्यांची सही घ्यायची नसते, असे स्पष्टीकरणही चड्ढा यांनी निलंबनानंतर दिले आहे.
मला का निलंबित केलंय, माझा काय गुन्हा आहे? असे म्हणत आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्ढा यांनी मोदी सरकारला प्रश्न विचारले आहेत. तसेच, एका ३४ वर्षीय तरुणाने तुम्हाला संसदेत प्रश्न विचारले याचा राग आहे का? एका तरुणाने देशातील सर्वात मोठ्या पक्षाला भाजप आणि अडवाणींच्या भूमिकेची आठवण करु दिली याचं वाईट वाटतंय का?, मी तुमच्याच पक्षाचा जाहिरनामा संसेदत दाखवून प्रश्न विचारले त्याचं दु:ख आहे का? असे म्हणत राघव चड्ढा यांनी खासदारकीच्या निलंबनावरुन मोदी सरकारला आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना प्रश्न केले आहेत. तसेच, हे लोकं खूप ताकदवान आहे, कुठल्याही थराला जाऊ शकतात, असेही चड्ढा यांनी म्हटलं.
याच आठवड्यात मला किमिटी ऑफ प्रिव्हीलेजच्या २ नोटीस आल्या आहेत. हा देखील एक रेकॉर्डच म्हणावा लागेल. सभागृहात सदस्यांना बोलू दिलं जात नाही. विरोधी पक्षनेत्यांचाच माईक बंद केला जातोय. याच पावसाळी अधिवेशना आम आदमी पक्षाच्या तीन खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. कदाचित देशात पहिल्यांदाच लोकसभेतील सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या पक्षाच्या नेत्याचेच निलंबन करण्यात आलंय. कोणीही यांना प्रश्न विचारायचा नाही, मग हे प्रत्येकाल निलंबित करतील, असे म्हणत राघव चड्ढा यांनी व्हिडिओतून मोदी सरकारविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केलाय.
या देशात प्रिव्हीलेज कमिटीने इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहनसिंग यांच्याविरुद्ध कारवाई केली. भाजपावाले ज्याप्रमाणे राहुल गांधींची सदस्यता काढू शकतात, तसेच आम आदमी पक्षाचीही सदस्यता काढतील. मात्र, मी शेवटपर्यंत यांच्याशी लढेल, सर्फरोशी की तमन्ना अब हमारे दिल मे है, देख ना है जोर कितना बाजू ए कातिल मै है... असे म्हणत मीही शहीद भगतसिंगांच्या भूमितला आहे, असा इशाराच राघव चड्ढा यांनी भाजपा नेत्यांना दिला आहे.