शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
2
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
3
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
4
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
5
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
6
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ३० जणांचा मृत्यू, १७ जखमी
7
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
8
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
9
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
10
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
11
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
13
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
14
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
15
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
16
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
17
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
18
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
19
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
20
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."

धक्कादायक! हॉस्पिटलची ऑक्सिजन पुरवठा करणारी लाईन चोरट्यांनी कापली, २० मुलांचे प्राण संकटात, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2023 1:31 PM

Rajasthan News : राजस्थानमधील अलवर येथून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. येथे चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने केलेल्या एका कृतीमुळे २० मुलांचे प्राण संकटात सापडले होते

जयपूर - राजस्थानमधील अलवर येथून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. येथे चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने केलेल्या एका कृतीमुळे २० मुलांचे प्राण संकटात सापडले होते. या चोरट्यांनी रविवारी रात्री रुग्णालयात घुसले. तिथे त्यांनी ऑक्सिजन सप्लाय करणारी पाइप लाइन चोरण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी चोरांनी ऑक्सिजन पाइप लाइन कापली. त्यामुळे एफबीएनसी वॉर्डमध्ये सुमारे २० नवजात मुले ऑक्सिजन सपोर्टवर होते. या प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला. घाईगडबडीत रुग्णालयातील स्टाफने तिथे असलेले लोक आणि पोलिसांच्या मदतीने सिलेंडरच्या मदतीने मुलांचे प्राण वाचवले. सुदैवाने यादरम्यान, रुग्णालयात मोठी दुर्घटना घडली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील गीतानंद शिशू रुग्णालयामध्ये रविवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. हॉस्पिटलमध्ये असलेली ऑक्सिजन सप्लायची पाईप लाइन चोरण्याच्या प्रयत्नामध्ये चोरट्यांनी ती कापली. त्यावेळी रुग्णालयातील एफबीएनची वॉर्डमध्ये भरती २० मुले ऑक्सिजन सपोर्टवर होती. अचानक ऑक्सिजनची सप्लाय बंद झाल्याने मुलांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यादरम्यान तिथे असलेल्या गार्डनी रुग्णालयाच्या मागून चोरट्यांना पळताना पाहिले. त्याने आरडाओरडा केल्यानंतर स्थानिक लोकांनी आणि रुग्णांच्या नातेवाईकांच्या मदतीने दोन चोरांना पकडण्यात आले. त्यानंतर त्यांना पोलिसांकडे सोपवण्यात आले. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी लोकांच्या मदतीने रुग्णालयाच्या परिसरात ठेवलेले १० ऑक्सिजन एफबीएनसी वॉर्डमध्ये नेऊन नवजात मुलांना ऑक्सिजन लावले.  

या प्रकरणाची माहिती त्वरित रुग्णालय प्रशासनाला देण्यात आली. अधिकाऱ्यांनी इंजिनियर्सना घटनास्थळी बोलावत रात्रीच पाइपलाइन दुरुस्त केली. त्यानंतर पुन्हा आयसीयूमध्ये ऑक्सिजन लाइन सुरू झाली.  

टॅग्स :Rajasthanराजस्थानhospitalहॉस्पिटल