ऑनलाइन लोकमत
सिमला, दि. 23 - 68 वा प्रजासत्ताक दिन आज देशभरात उत्साहात साजरा झाला. त्यासाठी पोलीस, सैनिकांचे संचलन, सांस्कृतिक कार्यक्रमांची देशभरात रेलचेल होती. पण उत्तरेकडील राज्यात खराब हवामानामुळे प्रजासत्ताक दिनाच्या आयोजनात अडचणी आल्या. पण हिमाचल प्रदेशमध्ये अशा बिकट परिस्थितीतही ध्वजवंदन आणि संचलनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. हिमाचलमधील केयलाँग येथे मैदानात साचलेल्या तीन फूट बर्फामध्ये ध्वजवंदन करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी पोलिसांनी दाट पसरलेल्या बर्फाच्या अडथळ्याला मात देत संचलन करून राष्ट्रध्वजाला दिमाखात सलामी दिली.
#WATCH: #RepublicDay parade held in Himachal Pradesh's Keylong in over 3ft snow on the ground (Earlier today) pic.twitter.com/FkTZekJP1Q— ANI (@ANI_news) 26 January 2017