शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
2
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
3
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
4
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
5
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
6
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?
7
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
8
होणाऱ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत घराबाहेर पडली अन् जंगलात जाऊन...
9
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
10
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...
11
व्होट जिहादच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं; किरीट सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
12
देवेंद्र जी, आप भी चुनाव लड रहे है... मोदींनी नाव घेताच देवेंद्र फडणवीस धावत आले, धुळ्यातील सभेत काय घडलं?
13
SA vs IND : ऋतुराज गायकवाडला पुन्हा का वगळलं? भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचं मोठं विधान
14
ट्रम्प यांची एक घोषणा आणि Waaree Energies Shares आपटले; २ दिवसांत १०% ची घसरण
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
16
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
17
Wipro ला मिळाल्या २ ब्लॉक डील्स; ८.५ कोटी शेअर्सचं ट्रान्झॅक्शन; शेअर्सवर काय परिमाम होणार?
18
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
19
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
20
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा

'त्यांना आपला इतिहास माहित नाही', CAA वर टीका करणाऱ्यांना जयशंकर यांचे सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 3:34 PM

'जगभरात अनेक ठिकाणी वंश आणि धर्माच्या नावावर नागरिकत्व दिले गेले.'

S Jaishankar on CAA: केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात नागरिकत्व सुधारणा कायदा(CAA) लागू केला. हा कायदा लागू झाल्यानंतर अमेरिकेसह अनेक देशांनी यावर प्रतिक्रिया दिल्या, टीकाही केली. आता त्या सर्व टीकांना भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jaishankar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. या कायद्याला फाळणीशी जोडून पाहणे महत्त्वाचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच, यापूर्वी अनेक देशांनी वंश, धर्माच्या नावावर नागरिकत्व दिल्याचे उदाहरण दिले. 

अमेरिकेने काय म्हटले होते?अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर म्हणाले होते की, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या अधिसूचनेबद्दल आम्ही चिंतित आहोत. धार्मिक स्वातंत्र्याचा आदर आणि कायद्यानुसार सर्व समुदायांना समान वागणूक ही मूलभूत लोकशाही तत्त्वे आहेत.या कायद्याची अंमलबजावणी कशी होईल यावर आमचे बारकाईने लक्ष आहे. 

अमेरिकेला खडसावलेयावर 'इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह 2024' मध्ये बोलताना जयशंकर म्हणाले, 'मी त्यांच्या लोकशाहीतील त्रुटी किंवा त्यांची तत्त्वे आणि कमतरता, यावर प्रश्न उपस्थित केलेला नाही. आपल्या इतिहासाबद्दलच्या त्यांच्या आकलनावर मी प्रश्न उपस्थित करत आहे. धर्माच्या नावावर देशाची फाळणी झाल्यानंतर ज्यां लोकांचा छळ झाला, अशा पीडितांना नागरिकत्व देण्यासाठी हा कायदा आणला आहे. या कायद्याद्वारे कोणाचेही नागरिकत्व हिरावले जाणार नाही. काही देश अशा प्रतिक्रिया देत आहेत, जसे काय भारताची कधी फाळणी झालीच नव्हती. '

जगभरात अनेक उदाहरणे...'जगात असे काही गट आहेत, जे एखादी समस्या घेतात आणि त्याचा इतिहास न जाणता त्याला राजकीय रुप देतात. नंतर हेच लोक असे दाखवण्याचा प्रयत्न करतात की, आम्ही सिद्धांतवादी आहोत आणि तुम्ही नाही. त्यामुळेच तुम्ही एखाद्या समस्येबद्दल बोलत असाल, तर त्याच्याशी संबंधित सर्व ऐतिहासिक संदर्भ पाहणे महत्वाचे आहे. जर तुम्ही मला विचाराल की इतर देश, वंश, धर्म, सामाजिक वैशिष्ट्यांच्या आधारे नागरिकत्व देतात का, तर मी तुम्हाला याची अनेक उदाहरणे देऊ शकतो. जग अशा उदाहरणांनी भरलेले आहे,' अशी प्रतिक्रिया जयशंकर यांनी दिली.

'CAA भारताचा अंतर्गत विषय, अमेरिकेने यात पडू नये'

दरम्यान, शनिवारी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनीही पत्रकार परिषद घेऊन अमेरिकेला सुनावले होते. अमेरिकेच्या विधानाला प्रत्युत्तर देताना जयस्वाल म्हणाले की, 'नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 ही भारताची अंतर्गत बाब आहे आणि त्याच्या अंमलबजावणीबाबत अमेरिकेचे विधान चुकीचे आणि अनावश्यक आहे. या कायद्याद्वारे 31 डिसेंबर 2014 पूर्वी अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशातून भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन समुदायातील अल्पसंख्याकांना नागरिकत्व दिले जाणार आहे. याद्वारे भारतातील कोणाचेही नागरिकत्व हिरावून घेतले जाणार नाही.'

'भारतीय राज्यघटना सर्व नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्याची हमी देते. अल्पसंख्याकांबद्दल कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची नगरज नाही. संकटात सापडलेल्या लोकांना मदत करण्याच्या स्तुत्य उपक्रमाला व्होट बँकेच्या राजकारणाशी जोडू नये. ज्यांना भारताच्या बहुलवादी परंपरा आणि त्या प्रदेशाच्या फाळणीनंतरच्या इतिहासाविषयी माहिती नाही, त्यांनी या प्रकरणात पडण्याचा प्रयत्न करू नये. भारताच्या हितचिंतकांनी या पाऊलाचे स्वागत केले पाहिजे.'

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकAmericaअमेरिकाBJPभाजपाcongressकाँग्रेस