नवी दिल्ली : काही देश दहशतवादाचे समर्थन करतात तर काही अतिरेक्यांवरील कारवाई रोखून अप्रत्यक्षपणे तेच करतात, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पाकिस्तान आणि चीनचा स्पष्ट संदर्भ देत लगावला.गृह मंत्रालयाने आयोजित केलेल्या तिसऱ्या ‘नो मनी फॉर टेरर मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स ऑन काउंटर-टेररिझम फायनान्सिंग’मध्ये ७० हून अधिक देश व आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींसमोर त्यांनी हे भाष्य केले.
मोदी म्हणाले...nजागतिक धोक्याचा सामना करताना संदिग्ध दृष्टिकोनाला जागा नाही. हा मानवता, स्वातंत्र्य आणि सभ्यतेवर हल्ला आहे. याला कोणत्याही सीमांचे बंधन नाही. केवळ एकसमान, एकसंध आणि शून्य-सहिष्णुतेचा दृष्टिकोन दहशतवादाचा पराभव करू शकतो.nआम्ही हजारो मौल्यवान जीव गमावले, पण आम्ही दहशतवादाशी धैर्याने लढलो.nजोपर्यंत दहशतवादाचे समूळ उच्चाटन होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही.