शीलेश शर्मा, नवी दिल्लीपरराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्याविरुद्ध केलेले आरोप कामकाजातून वगळण्यात यावे, अशी मागणी लोकसभेतील काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना एका पत्राद्वारे केली आहे. काँग्रेसचे प्रतोद के. सी. वेणुगोपाल यांनी गुरुवारी पत्रकारांना ही माहिती दिली.बोफोर्स प्रकरणावरून दिवंगत राजीव गांधी यांच्याविरुद्ध आरोप केल्याबद्दल सुषमा स्वराज यांनी बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी केली आहे. ते म्हणाले, स्वराज यांनी मोदींच्या मदतीसाठी ब्रिटनच्या उच्चायुक्तांशी चर्चा केली हे खरे की खोटे हे आधी स्वराज आणि जेटली यांनी सांगावे. स्वराज यांनी राजीव गांधींवर आरोप करण्याआधी जेटली यांना सत्य काय आहे हे विचारायला हवे होते, असे चिदंबरम म्हणाले. स्वराज यांनी सीबीआयद्वारा दाखल केलेल्या एफआयआरची माहिती घेतली होती काय? आरोप करण्याआधी ४ फेब्रुवारी २००४ रोजीचा न्या. कपूर यांचा निकाल पाहिला होता काय, असा सवाल चिदंबरम यांनी केला.
‘ते’ आरोप कामकाजातून वगळावेत
By admin | Published: August 13, 2015 10:18 PM