जामिन मिळाला त्यांनी आनंद घ्यावा; ही आणीबाणी नाहीय! मोदींचा काँग्रेसला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 07:04 PM2019-06-25T19:04:28+5:302019-06-25T19:05:56+5:30

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाच्या आभारप्रदर्शनामध्ये मोदी बोलत होते.

They should enjoy the bail; This is not an emergency! Narendra Modi's answer to Congress | जामिन मिळाला त्यांनी आनंद घ्यावा; ही आणीबाणी नाहीय! मोदींचा काँग्रेसला टोला

जामिन मिळाला त्यांनी आनंद घ्यावा; ही आणीबाणी नाहीय! मोदींचा काँग्रेसला टोला

Next

नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांच्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले असून ज्यांना जामिन मिळाला आहे त्यांनी आनंद घ्यावा, उठसूठ तुरुंगात टाकायला ही काही आणीबाणी नाही, असा टोलाही लगावला आहे. 


राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाच्या आभारप्रदर्शनामध्ये मोदी बोलत होते. सोमवारी काँग्रेसचे खासदार अधीर रंजन यांनी मोदी आणि भाजपा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी भ्रष्टाचारी असल्याचे आरोप करत दोनवेळा सत्तेवर आले आहे. जर ते चोर असतील तर संसदेत कसे बसलेत, असा सवाल मोदींना केला होता. तसेच मोदींवर टीका करताना त्यांची जीभही घसरली होती. यावर मोदींनी आज उत्तर दिले आहे. 


मोदींनी सांगितले की, आम्हाला अशासाठी दोषी धरले जात आहे की काही लोकांना आम्ही तुरुंगात टाकले नाही. ही काही आणीबाणी नाहीय की सरकार कोणालाही तुरुंगात डांबेल. ही लोकशाही आहे आणि न्यायव्यवस्था याचा निर्णय घेईल. आम्ही कायद्याला त्याचे काम करायला देतो. जर कोणाला जामिन मिळाला असेल त्याने आनंद घ्यावा. आम्ही बदला घेण्यावर विश्वास ठेवत नाही पण भ्रष्टाचाराच्या विरोधात लढाई जरूर सुरू ठेवणार. आम्हाला देशाने एवढे दिले आहे की चुकीच्या रस्त्यावर जाण्याची गरज नाही. 




संसदेत सांगितले गेले की, माझ्या उंचीला कोणी मोजू शकत नाही. पण आम्ही अशी चूक कधीच करणार नाही. मी कोणाची रेषा छोटी करण्यावर विश्वास ठेवत नाही, तर आपली रेषा मोठी करण्यावर जीवन खर्ची घालतो. तुमची उंची तुम्हालाच लखलाभ असे सांगत मोदींनी काँग्रेसला आणखी एक टोला लगावला. तुम्ही एवढ्या उंचीवर गेलात की पायाखालची जमीन दिसणे बंद झाले आहे. तुमची उंची आणखी वाढल्यास मला आनंदच होईल. आमचे स्वप्न उंच होण्याचे नसून मुळांशी जोडण्याचे आहे. या स्पर्धेत उलट आमच्या शुभेच्छाच आहेत, असे मोदी म्हणाले.




आणीबाणीचा डाग मिटणारा नाही....
25 जूनच्या रात्रीने देशाचा आत्मा चिरडला होता. यामुळे लोकांना या दिवशी काय असते याची माहिती आहे. भारतातील लोकशाही ही काही संविधानाच्या पानांतून तयार झाली नाही, तर ती कित्येक वर्षांपासून चालत आलेली आहे. प्रसारमाध्यमांना दाबण्यात आले. महापुरुषांना तुरुंगात डांबण्यात आले. देशालाच तुरुंग बनविण्यात आले होते. न्यायव्यवस्थेचा अपमान कसा करावा याचे जिवंत उदाहरण होते. हा डाग कधीच मिटणारा नाही, असेही मोदी यांनी सांगितले. 

Web Title: They should enjoy the bail; This is not an emergency! Narendra Modi's answer to Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.