नवी दिल्ली: घनदाट जंगल, बर्फाळ डोंगररांगा, नद्यांची मोठी पात्रे ओलांडून, तर काही दुर्गम भागात कित्येक किमी चालत किंवा हत्ती, घोड्यावरून किंवा हेलिकॉप्टरने जाऊन तिथे मतदान केंद्रे स्थापन करतात. लोकसभा, विधानसभा आदी निवडणुकांत हे दृश्य सर्रास पाहायला मिळते. देशातील शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी निवडणूक आयोगाकडून हे सारे प्रयत्न होत असतात.
हिमाचल प्रदेशातील लाहौल आणि स्पितीमधील ताशीगैंग या १५,२५६ फूट उंचीवर असलेल्या ठिकाणी जगातील सवाँत उंचीवरचे मतदान केंद्र स्थापन करण्यात येते. ताशीगैंग येथे केवळ ५२ मतदार असून त्यांच्यासाठी ही सोय करण्यात येते. हिमाचल प्रदेशात समुद्रसपाटीपासून १० ते १२ हजार फूट उंचीवरील भागांमध्ये ६५ मतदान केंद्रे व १२ हजार फुटांहून उंच ठिकाणी २० मतदान केंद्रे स्थापन करण्यात येतात. यंदाच्या लोकसभा निवडणुकांतही अशाच प्रकारची व्यवस्था असणार आहे. एखाद्या लहान बेटावरील लोकांना मतदान करता यावे म्हणून शिपिंग कंटेनरमध्ये मतदान केंद्र स्थापन केले जाते.
मणिपूरमध्ये काय?मणिपूरमधील संघर्षामुळे राज्यातच 8 दुसऱ्या ठिकाणी विस्थापित व्हावे लागलेल्या लोकांसाठी त्यांच्या निवारा छावण्यांजवळ आगामी लोकसभा निवडणुकांत ९४ विशेष मतदान कैटे स्थापन करण्यात येणार आहेत. या निवारा छावण्यांतील ५० हजार मतदार आहेत. २ मेघालयमध्ये पश्चिम जैनतिया हिल्स जिल्ह्यातील कामसिंग गावात जाण्यासाठी निवडणूक कर्मचाऱ्याऱ्यांना लाइफ जॅकेट घालून सुरक्षा जवानांसह नदी ओलांडाची लागते. जिल्ह्याच्या ठिकाणापासून हे गाव ६९ किमी लांब आहे. कामसिंग गावात फक्त ३५ मतदार असून त्यात २० पुरुष, १५ महिला आहेत.
ती एकमेव मतदार का?इटानगर : चीनसीमेलगत असलेल्या अरुणाचल प्रदेशमधील मालोगाम गावातील केवळ एका मतदारासाठी निवडणूक आयोगाला ३९ किमीची पायपीट करावी लागते. ४४ वर्षीय सोकेला तयांग ही मालोगाममधील एकमेव महिला मतदार आहे. तयाग याच्याशिवाय अन्य मतदाराची शेजारच्या मतदान केंद्रावर नोंदणी आहे. तयांग यांनी दुसऱ्या केंद्रावर नावनोंदणी करण्यास नकार दिल्याने ती गावातील एकमेव मतदार आहे.
गीरच्या जंगलातही एक मतदारगीरच्या घनदाट जंगलामध्ये बाणेज या भागात २००७च्या लोकसभा निवडणुकांत मतदान केंद्र उभारण्यात आले होते. तिथे महंत हरिदासजी उदासीन नावाचे पुजारी होते. त्यांच्यासाठी ही व्यवस्था करावी लागली होती. बानेज येथे केवळ एका मतदाराकरिता २० कर्मचारी येथे यायचे.