शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

त्यांना शेवटच्या चेंडूवर षटकार मारायचा आहे...; पंतप्रधान मोदींचे शरसंधान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2023 6:27 AM

संजय शर्मा । लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : २०२४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अविश्वास प्रस्ताव आणून विरोधक अंतिम चेंडूवर षटकार ...

संजय शर्मा । लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : २०२४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अविश्वास प्रस्ताव आणून विरोधक अंतिम चेंडूवर षटकार मारण्याचा विचार करीत आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप खासदारांना म्हटले आहे. भाजपने राज्यसभेत दिल्ली सेवा विधेयक मंजूर करून सेमीफायनल तर  जिंकले आहे. आता अविश्वास प्रस्ताव फेटाळून २०२४ची फायनल जिंकायची आहे, असेही त्यांनी म्हटले.

भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत मोदी यांनी राज्यसभा खासदारांचे अभिनंदन करून म्हटले आहे की, राज्यसभेत काल दिल्ली सेवा विधेयक भाजपने १०१च्या विरोधात १३१च्या जबरदस्त बहुमताने पारित केले. हे म्हणजे सेमीफायनल जिंकण्यासारखे आहे. आता लोकसभेत विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव फेटाळून २०२४ची फायनल जिंकायची आहे. स्वातंत्र्य दिनी देशभरात भाजप खासदारांनी ‘अमृत कलश यात्रा’ काढाव्यात, असे निर्देशही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. 

विरोधकांमध्येच अविश्वासविरोधकांवर टीका करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, विरोधकांच्या इंडिया आघाडीमधील पक्षांना एकमेकांबद्दल अविश्वास आहे. ते आपल्या सहयोगींच्या विश्वासाची चाचपणी करण्यासाठी अविश्वास प्रस्ताव घेऊन आले आहेत. अविश्वास प्रस्तावाबाबत मला आधीपासूनच माहीत होते. २०१८मध्ये मी म्हणालो होतो की, आपल्याविरुद्ध २०२३मध्ये असा प्रस्ताव आणला जाईल. विरोधकांचा पुन्हा एकदा घमेंडखोर असा उल्लेख करून मोदी म्हणाले की, सध्या देशातील भ्रष्टाचार, वंशवाद व तुष्टीकरणाचे राजकारण संपवण्याची वेळ आहे. विरोधी पक्षांचे नेते सामाजिक न्यायाबाबत बोलतात. परंतु वंशवादी, तुष्टीकरण व भ्रष्ट राजकारणाने याचे सर्वाधिक नुकसान केले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसदMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशन