मैत्रिणीशी बोलल्याच्या कारणावरुन तुंबळ हाणामारी
By admin | Published: December 05, 2015 11:50 PM
जळगाव: माझ्या मैत्रिणीशी तू का बोलला या कारणावरून शनिवारी रात्री ओकांरेश्वर मंदिर परिसरात चार ते पाच महाविद्यालयीन तरुणांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या तरुणांना ताब्यात घेतले.
जळगाव: माझ्या मैत्रिणीशी तू का बोलला या कारणावरून शनिवारी रात्री ओकांरेश्वर मंदिर परिसरात चार ते पाच महाविद्यालयीन तरुणांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या तरुणांना ताब्यात घेतले. ओंकारेश्वर मंदिर परिसरात एका क्लासेस्मध्ये तरुण-तरुणी शिकवणीसाठी येतात. शनिवारीही नेहमीप्रमाणे शाळेत एकाच वर्गात शिकणारे तरुण व तरुणी क्लास आले असता त्यातील एक तरुण दुसर्या तरुणीशी बोलत असल्याचे तिच्या मित्राला दिसला.त्याने त्या तरुणाला त्याचा जाब विचारला. ती माझी मैत्रिण आहे तू का तिच्याशी बोलतोस या कारणावरुन दोघांमध्ये शाब्दीक वाद झाला. त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. दोघं तिघांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याने गोंधळ निर्माण झाला होता. हे सर्व तरुण अल्पवयीन आहेत. त्यांना पोलीस स्टेशनला नेण्यात आले. तेथे दोघांच्या पालकांना बोलावण्यात आले. यात कोणीही तक्रार न दिल्याने गुन्हा दाखल झाला नाही, त्यामुळे समज देऊन त्यांना सोडून देण्यात आले.