ऑनलाइन लोकमत
वाराणसी, दि. १८ - दुचाकी चोरून ओएलएक्सवर विकणाऱ्या चोरांच्या टोळीच्या बनारस पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या टोळीतील अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी एकजण इंजिनियरिंगचा अभ्यास करत आहे. तर दुसरा शिकवण्या घेतो.
याबाबत पोलिस अधिकारी अखिलेश सिंग यांनी सांगितले की, दुचाकी चोरांना अटक करण्यासाठी ओएलएक्सवर गिऱ्हाइक बनून माहिती गोळा करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी सामने घाट परिसरातून नीरज सिंह आणि नितेश पांडे यांना एका चोरीच्या दुचाकीसह अटक करण्यात आली. अटक करण्यात आल्यानंतर चौकशीमध्ये दोघांनीही शहरातील वेगवेगळ्या विभागातून आणि व्यावसायिक आस्थापनांमधून दुचाकी चोरल्याचे त्यांनी मान्य केले आहे. या चोरांनी दाखवलेल्या जागेवरून लपवून ठेवलेल्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
दोन्ही चोरांपैकी नितेशने इंजिनियरिंगची परीक्षा दिली आहे. नितेश आणि निरज सोबत शाळेत काम करायचे. मात्र काही कारणाने नोकरीवरून काढल्याने त्यांनी दुचाकी चोरून पैसे कमावण्यास सुरुवात केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत ओलएलएक्सवर विकण्यात आलेल्या डझनभर दुचाकी आणि त्यांच्या टोळीतील अन्य सदस्यांची माहिती मिळाली आहे.
दिल्लीचा रॉबिनहूड! श्रीमंतांकडे चोरी करून करायचा गरिबांना मदत
श्रीमंतांकडे चोरी करून गोरगरिबांना मदत करणाऱ्या रॉबिनहूडविषयी तुम्ही ऐकलंच असेल. पण असाच अजब चोर दिल्ली पोलिसांच्या हाती लागला आहे. स्वत:ला दिल्लीचा रॉबिनहूड समजणारा हा चोर रात्री श्रीमंतांच्या घरी जाऊन मौल्यवान ऐवज रोख रक्कम चोरायचा आणि नंतर बिहारमधील आपल्या गावी जाऊन गोरगरिबांना मदत करायचा. या चोराने अनेक गरिबांना लग्नासाठी पैसे दिल्याचेही समोर आहेल आहे.
दक्षिण पूर्व दिल्लीडे डीसीपी रोमिल बनिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, "इरफान उर्फ उजाला ऊर्फ आर्यन (२७) हा युवक दिल्लीत राहायचा. त्याने गेल्या काही महिन्यात दिल्लीतील न्यू फ्रेंड्स कॉलोनी, जामिया नगर आणि लाजपतनगर भागात १२ हून अधिक चोऱ्या केल्या आहेत. न्यू फ्रेंड्स कॉलनीतील राजीव खन्ना यांच्या घरीसुद्धा चोरीची अशीच घटना घडली होती. त्या चोरीचा तपास करताना पोलिसांना सीसीटीव्हीमध्ये एक व्यक्ती दिसली. त्या चेहऱ्याचा शोध घेत पोलिसांनी बिहारमध्ये जाऊन एका चोराला ताब्यात घेतले."