दौलताबादच्या बसथांब्यावर तिसर्या डोळ्याची नजर
By admin | Published: June 25, 2015 11:51 PM
दौलताबाद : येथील ग्रामपंचायत कार्यालय व बसथांबा परिसरासह मुख्य रस्त्यांवर तिसर्या डोळ्याची नजर राहणार आहे. ग्रामपंचायतीतर्फे ग्रामविस्तार अधिकारी पी.एस. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हे काम करण्यात येत आहे.
दौलताबाद : येथील ग्रामपंचायत कार्यालय व बसथांबा परिसरासह मुख्य रस्त्यांवर तिसर्या डोळ्याची नजर राहणार आहे. ग्रामपंचायतीतर्फे ग्रामविस्तार अधिकारी पी.एस. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हे काम करण्यात येत आहे.दौलताबाद येथील बसथांब्याजवळील जामा मशीद मिनारवर दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून, यामुळे बसथांबा परिसर, महामार्ग, गवळीवाडा रस्ता, भीमनगर रस्ता तसेच ग्रामपंचायत कार्यालयातील तीन त्यात मुख्य मुख्य बैठक हॉल, कागदपत्रे विभाग, ग्रामविस्तार अधिकारी कार्यालय यांचा समावेश आहे. यासह अजून दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची जागा लवकरच निश्चित करण्यात येणार असून, भविष्यात ऐतिहासिक दौलताबाद किल्ल्यासमोर तसेच देवगिरी शाळेसमोर व ज्या ठिकाणी अवश्यकता असेल त्या ठिकाणी कॅमेरे लावण्यात येतील. हे काम ग्रामविकास निधीतून होत असल्याची माहिती ग्रामविस्तार अधिकारी पी.एस. पाटील यांनी दिली. येथील बसस्थानक परिसरात अनेक छोट्या-मोठ्या घटना घडत असतात. तसेच पर्यटकांसोबतच विद्यार्थ्यांचीही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वर्दळ चालू असते. त्यामुळे या ठिकाणी सीसीटीव्हीची आवश्यकता होतीच, असे गावकर्यांनी मत व्यक्त केले.---जिल्हा आरोग्य अधिकार्यांची भेटआमठाणा : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी.टी. जमादार यांनी अचानक भेट दिल्यामुळे गुरुवार रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचार्यांची चांगलीच तारांबळ उडाली.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी.टी. जमादार यांनी दवाखान्याच्या परिसराची पाहणी केली असता त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. ---------------------------------------------------------वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या पवार यांना कर्मचार्यांकडे श्रमदान करून साफसफाई करण्याचे आदेश दिले.-------------------- दवाखान्याच्या परिसरामध्ये अस्वच्छता पसरली असल्याने याबद्दल अधिकार्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.