पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात बुधवारी ५३.३२ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यासोबतच राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या दोन मुलांसह ८०८ उमेदवारांचे राजकीय भवितव्य यंत्रबंद झाले. या भागात गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा तीन टक्के जास्त मतदान झाले आहे.अपेक्षेप्रमाणे मतदान शांततेत पार पडले. मात्र या काळात गोंधळ घातल्याच्या आरोपात ठिकठिकाणी ५९ लोकांना अटक करण्यात आली आहे.तिसऱ्या टप्प्यात सहा जिल्ह्णांमधील ५० विधानसभा मतदारसंघांचा समावेश होता. अतिरिक्त निवडणूक अधिकारी आर.लक्ष्मणन यांनी सांगितले की, सर्वात कमी ५१.८२ टक्के मतदान पाटण्यात झाले. तर सर्वात जास्त ५६.५८ टक्के मतदानाची नोंद बक्सर जिल्ह्णात करण्यात आली.आज ज्या महत्त्वाच्या उमेदवारांचे राजकीय भवितव्य सीलबंद झाले त्यात बिहार विधानसभेचे उपाध्यक्ष अमरेंद्र प्रतापसिंग, लालूप्रसाद यादव यांचे दोन पुत्र तेजप्रताप यादव (महुआ)आणि तेजस्वी यादव (राघोपूर), बिहारचे मंत्री श्रवणकुमार (नालंदा), विधानसभेतील विरोधी पक्ष नेते नंदकिशोर यादव, भाजपाचे मुख्य प्रतोद अरुणकुमार सिन्हा आदींचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)
बिहारमध्ये तिसऱ्या टप्प्यात ५३.३२ टक्के मतदान
By admin | Published: October 28, 2015 10:06 PM