शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

भरगच्च कार्यक्रमांनी रंगणार तिसरे रसिकराज राज्यस्तरीय संमेलन

By admin | Published: January 30, 2016 12:17 AM

- रसिकराज व कमला नेहरू महाविद्यालयाचे आयोजन : अध्यक्षस्थानी विश्वास पाटील

- रसिकराज व कमला नेहरू महाविद्यालयाचे आयोजन : अध्यक्षस्थानी विश्वास पाटील
नागपूर : रसिकराज सांस्कृतिक संस्थेच्यावतीने तिसरे राज्यस्तरीय रसिकराज मराठी साहित्य संमेलन १९ व २० मार्च रोजी कमला नेहरू महाविद्यालयाच्या सहकार्याने महाविद्यालयाच्या सक्करदरा परिसरात आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष अमर सेवा मंडळाचे सचिव ॲड. अभिजित वंजारी आहेत. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी लोकप्रिय कादंबरीकार विश्वास पाटील राहणार असून उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येईल. उद्घाटनाला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष पी. डी. पाटील, महापौर प्रवीण दटके, कुलगुरू डॉ. सिद्धार्थ विनायक काणे, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, प्रा. सुरेश द्वादशीवार, गीतकार प्रवीण दवणे, गुरू ठाकूर, विसुभाऊ बापट, डॉ. विठ्ठल वाघ, डॉ. वि. स. जोग, सुधीर गाडगीळ, डॉ. रवींद्र शोभणे, शुभांगी भडभडे, मेजर हेमंत जकाते, डॉ. रामचंद्र देखणे उपस्थित राहतील. या साहित्य संमेलनात ११ सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यात विश्वास पाटील यांची मुलाखत, कथाकथन, निमंत्रितांचे कविसंमेलन, अभिरूप न्यायालय, मराठी गीतांचा कार्यक्रम, मकरंद अनासपुरे यांची मुलाखत आदी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी अक्षरलेणी या साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येईल. बाहेरगावाहून येणाऱ्या रसिकांची निवास व्यवस्था नाममात्र शुल्कात करण्यात येईल. यासंदर्भात महाविद्यालयात संपर्क साधता येईल. यासंदर्भात अधिक माहितीसाठी रसिकराजचे बळवंत भोयर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.