जयपूर : मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये सत्तेत येताच शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणाऱ्या काँग्रेसने आता तिसरे राज्य राजस्थानमध्येही शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे.
गेल्या आठवड्यात लागलेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने एक राज्य गमावले. मात्र, भाजपशासित तीन राज्ये ताब्यात घेतली. या निवडणुकांमध्ये काँग्रेसने प्रचारावेळी राज्यांना वेगवेगळी आश्वासने दिली होती. मात्र, निवडून आल्यानंतर जिंकलेल्या तिन्ही राज्यांमध्ये शेतकऱ्यांची 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी केली आहे.
राजस्थानमध्ये आज काँग्रेस सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. या कर्जमाफीमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर 18 हजार कोटींचा बोजा पडणार असून तो सहन केला जाईल असे सरकारने स्पष्ट केले.