शहरं
Join us  
Trending Stories
1
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
2
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
3
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
4
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
5
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
6
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
7
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
8
धक्कादायक! गाडी नीट चालवायला सांगितली म्हणून पोलिसाची केली हत्या; दिल्लीतील घटना
9
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
10
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम
11
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
12
IND vs BAN T20 : ऋतुराज गायकवाडला पुन्हा डच्चू! चाहत्यांचा रोष; चांगली कामगिरी असूनही वगळलं
13
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
14
"CSK च्या चाहत्यांसाठी दुःखाची बाब आहे पण...", गंभीरची जागा घेताच ड्वेन ब्राव्हो भावुक
15
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
16
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
17
Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय?
18
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
19
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
20
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप

‘ईडी’ प्रमुखांचा तिसरा कार्यकाळ बेकायदा; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 5:45 AM

सर्वोच्च न्यायालयाने ८ मे रोजी ईडी प्रमुखांचा कार्यकाळ तिसऱ्यांदा वाढविण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर निकाल राखून ठेवला होता

नवी दिल्ली - अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) प्रमुख संजयकुमार मिश्रा यांचा कार्यकाळ तिसऱ्यांदा वाढविण्याचा निर्णय बेकायदा ठरवत सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा वाढीव कार्यकाळ ३१ जुलैपर्यंत कमी केला. यावर्षी वित्तीय कार्यवाही कृतिदलाकडून सुरू असलेल्या संबंधित आढावा प्रक्रियेच्या दृष्टिकोनातून व सुरळीत हस्तांतरण सुनिश्चित करण्यासाठी मिश्रा यांचा कार्यकाळ ३१ जुलैपर्यंत असेल, असे न्यायमूर्ती बी. आर. गवई, न्यायमूर्ती विक्रम नाथ व न्यायमूर्ती संजय करोल यांच्या खंडपीठाने सांगितले.

सरकारच्या अधिसूचनेनुसार, मिश्रा यांचा कार्यकाळ १८ नोव्हेंबर २०२३ पर्यंत निश्चित होता. मात्र, खंडपीठाने ईडी संचालकांचा कार्यकाळ जास्तीत जास्त पाच वर्षांपर्यंत वाढवण्याच्या केंद्रीय दक्षता आयोग कायदा व दिल्ली विशेष पोलिस आस्थापना कायद्यातील सुधारणांवर शिक्कामोर्तब केले. सर्वोच्च न्यायालयाने ८ मे रोजी ईडी प्रमुखांचा कार्यकाळ तिसऱ्यांदा वाढविण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर निकाल राखून ठेवला होता. गेल्यावर्षी १२ डिसेंबर रोजी न्यायालयाने या याचिकांवर केंद्र सरकार आणि इतरांकडून उत्तरे मागवली होती.

जया ठाकूर यांच्या याचिकेवर न्यायालयाने केंद्र सरकार, केंद्रीय दक्षता आयोग आणि ईडी संचालकांना नोटीस बजावली होती. केंद्र सरकार राजकीय विरोधकांच्या विरोधात ईडीचा गैरवापर करून लोकशाहीची मूलभूत रचना नष्ट केल्याचा आरोप ठाकूर यांनी याचिकेत केला आहे.  काँग्रेस नेते रणदीपसिंग सुरजेवाला, तृणमूल काँग्रेसचे खासदार महुआ मोईत्रा आणि साकेत गोखले यांनीही ईडी प्रमुखांच्या मुदतवाढीविरोधात याचिका दाखल केल्या होत्या.

केंद्राने काढला होता वटहुकूम...मिश्रा यांची प्रथम १९ नोव्हेंबर २०१८ रोजी ईडीच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. नंतर १३ नोव्हेंबर २०२० रोजी त्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ तीन वर्षांचा केला. सरकारने गेल्यावर्षी एक वटहुकूम जारी केला होता. ज्या अंतर्गत ईडी प्रमुखांना तीन वर्षांची मुदतवाढ दिली जाऊ शकते.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकार