नवी दिल्ली - कोरोना काळात केंद्र सरकारने देशातील गरीब आणि गरजूंना विविध प्रकारची मदत केली. कुणावरही अन्नासाठी चिंतित होण्याची वेळ येऊ नये, असा या मागचा हेतू होता. देशात पुन्हा एकदा कोरोनाची तिसरी लाट आली आहे. अशा स्थितीत सोशल मीडियावर अनेक प्रकारचे मेसेज व्हायरल होत आहेत. यातच, भारत सरकार कोरोना फंडातून 5000 रुपये देत असल्याचा दावाही एका मेसेजमध्ये करण्यात आला आहे.
सरकार देतेय 5000 रुपये -कोरोना काळात सोशल मीडियावर अनेक फेक मेसेज व्हायरल होत आहेत. अशाच व्हायरल होत असलेल्या एका मेसेजमध्ये, भारत सरकारकडून 5000 रुपये देण्यात येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. एवढेच नाही, तर आपल्यालाही हे 5000 रुपये हवे असल्यास लगेच फॉर्म भरा, असेही या मेसेजमध्ये म्हणण्यात आले आहे.
पीआयबीने केले फॅक्ट चेक -जेव्हा PIB ला या व्हायरल मेसेजसंदर्भात माहिती मिळाली तेव्हा PIB ने त्या मेसेजची सत्यता तपासली. यानंतर, हा मेसेज पूर्णपणे खोटा असल्याचे पीआयबीने म्हटले आहे. यासंदर्भात, पीआयबीने आपल्या अधिकृत ट्विटरवर ट्विट करून माहितीही दिली आहे.
PIB ने केले ट्विट -पीआयबीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, संबंधित फेक मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे, की भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडून कोरोना फंडअंतर्गत 5000 रुपये दिले जात आहेत. हा मेसेज पूर्णपणे फेक आहे. अशा प्रकारचे फेक मेसेज फॉरवर्ड करू नका. अशा संशयास्पद वेबसाइटवर आपली कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करू नका.
अशा प्रकारच्या मेसेजपासून सावध राहा -फॅक्ट चेक केल्यानंतर पीआयबीने हा संबंधित मेसेज पूर्णपणे फेक असल्याचे म्हटले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अशा मेसेजपासून प्रत्येकाने सावध रहायला हवे.