संविधान तयार करताना बाबासाहेबांनी जे स्वप्न बघितले होते, ते दिसत नाही. बंधुत्वासंदर्भात बोलले तर म्हणतात, 'एक हैं तो सेफ हैं'. आपण केवळ नावापुरताच संविधान दिवस साजरा करत आहोत. त्याचा आत्मा तर मारला गेला आहे, असे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM)चे प्रमुख ओवेसी यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर, समानतेची चर्चा होऊ नये, यासाठी आपण संविधान दिवस साजरा करत आहोत का, असा सवालही त्यांनी केला. तसेच, बुरख्यापासून आणि हलाल मांसापासून धोका असल्याचेही बोलले जाते, असेही ते म्हणाले. ते मंगळवारी एबीपी न्यूजशी बोलत होते.
संभलमधील हिंसाचारासंदर्भात बोलताना ते म्हणाले, "व्हिडिओमध्ये पोलीस गोळीबार करताना दिसत आहेत. 'लम्हों ने खता की और सदियों ने सजा पाई'. 17 वर्षांचा मुलगा कैफ मारला जातो. तीन जणांच्या छातीत गोळी चालवली गेली. या सरकारला बांगलादेशातील हिंदूंची अधिक काळजी आहे. मात्र संभलमध्ये मारल्या गेलेल्या मुलाची चिंता नाही. कधी म्हणतात, मदरशांमधूनम मुलांना काढा. निवडणुकीत मुस्लिमांबद्दल अपशब्द वापरले जातात."
"सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही" -ओवेसी म्हणाले, "6 डिसेंबरला काय झाले हे सर्वांनाच माहीत आहे. हो लोक दुसऱ्यांदा सर्वेक्षणासाठी का गेले? एवढेच नाही, तर न्यायालयानेही सर्वेक्षणासाठी तत्काळ आदेश दिला. या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही. न्यायासंदर्भात बोलणाऱ्याला देशद्रोही म्हटले जाते. जोवर भाजप सरकार एका विशिष्ट समाजाला प्रोत्साहन देत राहणार, तोवर ही परिस्थिती बिघडत राहणार."
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज" -असदुद्दीन ओवेसी म्हणाले, "जे लोक हिंदूंच्या हक्कासंदर्भात बोलतात ते निर्लज्ज आहेत. आपण मुस्लीम वस्तीत शाळादेखील सुरू करत नाही. 'एक हैं तो सेफ हैं' आणि 'बटेंगे तो कटेंगे' या घोषणा देऊन कुणाकडे इशारा करत आहात? या देशातील जनतेने इंदिरा गांधींपासून ते राजीव गांधी आणि काँग्रेसपर्यंत सत्तेवरून बाहेर केले. तर मोदी आणि योगी काही बाहेरून आलेले नाहीत. तेही सत्तेतून बाहेर जातील."