Delhi Coaching Incident: दिल्लीतील ओल्ड राजेंद्रनगर यथे असलेल्या RAUS इन्स्टिट्युट आयएएस कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी भरल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे वृत्त समजताच अग्निशमन दलाची सात वाहने घटनास्थळी पोहोचली. त्याशिवाय एनडीआरएफची टीमही घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.दरम्यान, आता या प्रकरणी प्रत्यक्षदर्शींनी मोठा खुलासा केला आहे.
दरम्यान, या घटनेबाबत माध्यमांना माहिती देताना एका प्रत्यक्षदर्शीने मोठा खुलासा केला.'राव आयएएस ॲकॅडमीच्या तळघरात बायोमेट्रिक बसवले आहे. या मशिनला थंब दिल्याशिवाय बाहेर पडता येत नाही. काल पाण्यामुळे हे बायोमेट्रिक मशिन बंद पडले होते, त्यामुळे कोणालाही बाहेर पडता आले नाही.'या अपघाताला प्रशासन जबाबदार आहे. येथील विद्यमान आमदार आणि खासदार एकमेकांवर आरोप करत आहेत, असा आरोपही त्या एका व्यक्तिने केला आहे.
दिल्लीमध्ये आयएएस कोचिंग सेंटरमध्ये भरलं पाणी, एका विद्यार्थ्याचा मृत्यू
दरम्यान, आता या प्रकरणावरुन आम आदमी पक्ष आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
खटला दाखल करणार
जुन्या राजेंद्र नगरच्या घटनेवर, डीसीपी सेंट्रल एम हर्ष वर्धन म्हणाले, "आम्ही फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. आमच्या फॉरेन्सिक टीम्स येथे आहेत. फॉरेन्सिक पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आम्ही योग्य तपास केला पाहिजे." या प्रकरणात आम्ही खटला नोंदवणार आहोत, असंही ते म्हणाले.
आप आमदार दुर्गेश पाठक म्हणाले, "हा सखल भाग आहे. या लाईनवरून पाणी वाहत आहे. नाला किंवा गटार तुटून तळघरात पाणी तुंबले आहे. पथके आपले काम करत आहेत. भाजप त्यांनी काय केले याचेही उत्तर द्यावे.
भाजप खासदार बन्सुरी स्वराज म्हणाले, "ही मुले त्यांचे भविष्य सुधारण्यासाठी येथे आली होती, पण दिल्ली सरकारने स्थानिकांचे ऐकले नाही. येथील आमदार दुर्गेश पाठक यांना नाली साफ करण्यास सांगितले जात होते, पण त्यांनी तसे केले नाही. असे करू नका, तळघर पूर्णपणे पाण्याने भरले आहे आणि या मृत्यूला केजरीवाल सरकार जबाबदार आहे, असा आरोपही त्यांनी केला.