जयपूर : ईडीने मंगळवारी जल जीवन मिशनमधील अनियमिततेशी संबंधित असलेल्या मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीत राजस्थानचे माजी मंत्री महेश जोशी आणि इतर काही लोकांशी संबंधित असलेल्या ठिकाणांची झाडाझडती घेतली.जल जीवन मिशनमधून बेकायदा कमावलेला काळा पैसा पांढरा करण्यासाठी अनेक मध्यस्थ आणि मालमत्ता विक्रेत्यांनी राजस्थान सरकारच्या पीएचई विभागाच्या अधिकाऱ्यांशी संधान बांधले होते. अधिकाऱ्यांना लाच देऊन जल जीवन मिशनच्या कामांशी संबंधित निविदा मिळवण्यात कंत्राटदारांचा सहभाग असल्याचे तपासात आढळून आले आहे.
काळा पैसा पांढरा करण्यासाठी असाही उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 12:51 PM