शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
3
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
4
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
5
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
6
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
7
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
8
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
9
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
10
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
11
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
12
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
13
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
14
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
15
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
16
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!
17
दिवाळी, छटपूजेनिमित्त मध्य रेल्वेच्या ५८३ गाड्या
18
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
20
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

"... ही भाजपच्या अंताची सुरूवात," कर्नाटकच्या निकालांवरून ममता बॅनर्जींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 7:27 PM

कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसचं अभिनंदन केलंय.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसचं अभिनंदन केलं आहे. तसंच पुढच्या लोकसभा निवडणुकीत भाजप १०० जागाही पार करू शकणार नाही, असा दावा त्यांनी केलाय. “मी कर्नाटकातील सर्व जनतेला सॅल्युट करते. विजेत्यांचे त्यांच्या विजयाबद्दल अभिनंदन. कुमारस्वामी यांनीही चांगली कामगिरी केली. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या निवडणुका येत आहेत आणि मला वाटतं की दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव होईल. लोकसभा निवडणुकीपूर्वी ही भाजपचा अंताची सुरूवात आहे. मला वाटत नाही की ते १०० चा आकडाही पार करू शकतील,” असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

“कर्नाटक विधानसभा निवडणुकीत निर्दयी हुकूमशाही आणि बहुमतवादी राजकारणाचा पराभव झाला आहे. परिवर्तनाच्या बाजूने निर्णायक जनादेश दिल्याबद्दल मी कर्नाटकच्या जनतेला सॅल्युट करते,” असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. “जेव्हा लोकांना लोकशाही शक्तींना जिंकवायचं असतं तेव्हा त्यांच्यावर कोणीही दाबू शकत नाही. ही सर्वांसाठी एक शिकवण आहे,” असंही त्या म्हणाल्या.

कर्नाटकात भाजपचा पराभव

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाला दारुण पराभव स्वीकारावा लागला. २२४ जागा असलेल्या कर्नाटक विधानसभेत भाजपाच्या खात्यात केवळ ६४ जागा गेल्या. तर काँग्रेसने तब्बल १३६ जागांवर विजय मिळवला. या पराभवाबरोबरच भाजपाच्या दक्षिण भारतातील अभियनाला मोठा धक्का बसला आहे.

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकMamata Banerjeeममता बॅनर्जीcongressकाँग्रेसBJPभाजपा