नवी दिल्ली - जर तुम्हाला जुन्या नोटा किंवा नाणी गोळा करण्याचा छंद असेल तर तुम्ही त्याचा माध्यमातून चांगली कमाई करू शकता. अशी जुनी नाणी आणि नोटांचा भाव आता मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आज आम्ही तुम्हाला एक रुपयाच्या अशा एका नोटीबाबत सांगणार आहोत, ज्याची किंमत ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्यावाचून राहणार नाही. सर्वसाधारणपणे एक रुपयाच्या नोटीचे मूल्य हे एक रुपयाच असते. मात्र जर तुमच्याकडे ही युनिक नोट असेल तर ती तुम्ही हजारो लाखो रुपयांना विकून बक्कळ कमाई करू शकता. एका वेबसाईटवर एक रुपयाची एक नोट हजारो रुपये किमतीला विकली जात आहे.
बाजारामध्ये यूनिक आणि दुर्मीळ नोटांना अधिक मागणी असते. तसेच अशा नोटा खरेदी करण्यासाठी अनेक हौशी लोक उत्सुक असता. सध्या coinbazzar.com वर एक यूनिक नोट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. या नोटेची किंमत ४२ हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र ही नोट सध्या तरी १३ हजार रुपये डिस्काऊंटमध्ये मिळत आहे. कारण या नोटेची खरी किंमत ही ५५ हजार रुपये एवढी आहे. या नोटेची खरी किंमत ही ५५ हजार रुपये आहे.
एवढ्या महागड्या किमतीला ही नोट विकण्यामागे नेमकं कारण काय आहे ते आपण जाणून घेऊयात. ही नोट ३० वर्षे जुनी आहे. या नोटेमध्ये असलेली खास बाब म्हणजे या नोटेचा नंबर होय. या नोटेचा नंबर ७८६७८६ आहे आणि त्याचं प्रीफिक्स 56S आहे. या नोटेवर तत्काललीन वित्त सचिव एस व्यंकटरमणन यांची सही आहे. अशा नोटा खऱेदी करण्यासाठी अनेक जण तयार असतात. तुमच्याकडेही अशी नोट असेल तर तुम्हीही ऑनलाईन वेबसाईटवर अकाऊंट उघडून आपल्याकडील नोटांची किंमत लावून विकू शकता. अनेक वेबसाईटवर अशा नोटांचा लिलाव केला जात आहे, त्यातून बऱ्यापैकी रक्कम मिळू शकते.