शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

यंदा विक्रमी संख्येने भाविकांनी वैष्णोदेवीचे घेतले दर्शन; १० वर्षांचा मोडला विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 10:09 PM

दररोज ३७,००० ते ४४,०० भाविक वैष्णोदेवीच्या यात्रेला जात आहेत.

दरवर्षी लाखो लोक वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जातात. यावर्षी विक्रमी संख्येने भाविकांनी वैष्णोदेवीचे दर्शन घेतले. गेल्या दशकात या वर्षी विक्रमी ९३.५० लाख भाविकांनी वैष्णोदेवीचे दर्शन घेतले.

अधिकृत आकडेवारीनुसार, या वर्षी सोमवारपर्यंत ९३.५० लाख लोकांनी जम्मूच्या रियासी जिल्ह्यातील त्रिकुट टेकड्यांवर बांधलेल्या वैष्णोदेवी मंदिराला भेट दिली. यापूर्वी २०१३ मध्ये सर्वाधिक ९३.२४ लाख भाविकांनी वैष्णोदेवीचे दर्शन घेतले होते.

श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंशुल गर्ग म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत या वेळी सर्वाधिक ९३.२४ लाख भाविक वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी आले आहेत. इतिहासात असे केवळ दोनदाच घडले आहे, जेव्हा वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या एक कोटीच्या पुढे गेली आहे. २०१२मध्ये १.०४ कोटी यात्रेकरूंनी तर २०११मध्ये १.०१ कोटीहून अधिक भाविकांनी वैष्णोदेवीचे दर्शन घेतले होते.

गर्ग म्हणाले की, दररोज ३७,००० ते ४४,०० भाविक वैष्णोदेवीच्या यात्रेला जात आहेत. या वर्षाच्या अखेरीस हा आकडा ५० हजारांवर जाऊ शकतो. यंदा वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या ९५ लाखांच्या पुढे जाईल, असा अंदाज आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, अलीकडच्या काही महिन्यांत, श्राइन बोर्डाने प्रवास अधिक सोयीस्कर करण्यासाठी अनेक बदल केले आहेत, ज्यामध्ये स्कायवॉकचाही समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या वर्षी ऑक्टोबरमध्ये स्कायवॉक आणि नूतनीकरण केलेल्या पार्वती भवनाचे उद्घाटन केले होते.

टॅग्स :TempleमंदिरIndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीर