नवी दिल्ली : यंदाचा सणासुदीचा हंगाम वाहन क्षेत्रासाठी गाेड ठरला आहे. बहुतांश वाहन उत्पादक कंपन्यांच्या प्रवासी वाहनांच्या विक्रीत माेठी वाढ नाेंदविण्यात आली आहे. विविध कंपन्यांनी ऑक्टाेबरमधील वाहनविक्रीचे आकडे जाहीर करण्यास सुरुवात केली. त्यावरून या कंपन्यांसाठी दसरा, दिवाळी जाेरदार ठरल्याचे दिसत आहे. मध्यम श्रेणी आणि एसयूव्हीची मागणी यावेळी वाढलेली आहे. एन्ट्री लेव्हलच्या वाहनांनाही मागणी राहिली. यंदा दुचाकींची मागणी तुलनेने कमी झाल्याने काही प्रमाणात निराशा आहे.
दुचाकी विक्रीने केली निराशा
हीराे, हाेंडा आणि स्कूटर इंडिया, टीव्हीएस इत्यादी कंपन्याच्या दुचाकी विक्रीत अपेक्षित उठाव दिसला नाही. बजाज ऑटाेच्या विक्रीत घट नाेंदविण्यात आली.
ऑक्टाेबर २२ ऑक्टाेबर २१ हिराे माेटाेकाॅर्प १७% ४,५४,५८२ ५,४७,९७०बजाज ऑटाे १०% ३,९५,२३८ ४,३९,६१५