Central Vista: “पंतप्रधान मोदी, आतातरी जागे व्हा”; सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावरून केंद्रावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 04:46 PM2021-05-13T16:46:25+5:302021-05-13T16:47:16+5:30

Central Vista: विरोधकांनी केंद्र सरकावर टीका केली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी जागे व्हा, असा टोला लगावण्यात आला आहे.

thomas isaac says Wake up PM and use vista money for vaccination | Central Vista: “पंतप्रधान मोदी, आतातरी जागे व्हा”; सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावरून केंद्रावर टीका

Central Vista: “पंतप्रधान मोदी, आतातरी जागे व्हा”; सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावरून केंद्रावर टीका

Next

तिरुवनंथपूरम: देशात कोरोनाचे थैमान सुरू आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढत दिसून येत असून, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या उच्चांक गाठत आहे. देशातील परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. यातच कोरोना लस, ऑक्सिजन, रेमडेसिवीर, बेड्स यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. तरीही दिल्लीत नवीन संसद भवन आणि पंतप्रधानांचे नवे निवासस्थान असलेल्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यावरून विरोधकांनी केंद्र सरकावर टीका केली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी जागे व्हा, असा टोला लगावण्यात आला आहे. (thomas isaac says Wake up PM and use vista money for vaccination)

सेंट्रल विस्टा प्रकल्पाचे काम थांबवण्यात यावे, यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच विरोधी पक्षाकडून केंद्रातील मोदी सरकारवर टीका करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर देशातील एकूण १२ विरोधी पक्षांच्या प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून हा प्रकल्प तातडीने थांबवण्याची मागणी केली आहे. यातच आता केरळचे अर्थमंत्री थॉमस आयझॅक यांनीही या प्रकल्पावरून टीका करत याचा पैसा लसीकरणासाठी वापरावा असे म्हटले आहे. 

कुठे हवन तर कुठे जलार्पण; अंधश्रद्धेचा वेढा असताना कसा जिंकणार कोरोनाविरुद्धचा लढा?

जागे व्हा, पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींची सेंट्रल व्हिस्टासाठीची अतीव इच्छा ही अनेक राज्यकर्त्यांना किंवा हुकुमशाहांना मोठमोठ्या वास्तूंवर आपलं नाव पुढच्या पिढ्यांसाठी कोरून ठेवण्यासाठी असलेल्या इच्छेसारखीच वाटतेय. जागे व्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी. व्हिस्टासाठीचा पैसा लसीकरणासाठी वापरा, असे ट्विट थॉमस आयझॅक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून केले आहे. 

कोरोना नियमांचे पालन

सेंट्रल विस्टा प्रकल्पाच्या कामाचे केंद्र सरकारकडून समर्थन करण्यात आले आहे. हे काम कोरोना कर्फ्यू लागण्यापूर्वीच सुरू झाले आहे. तसेच या कामासाठी काम असलेले मजूर यांची योग्य काळजी घेतली जात आहे. कामाच्या ठिकाणी आणि मजुरांच्या राहण्याच्या ठिकाणी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन केले जात आहे. याशिवाय, मजुरांना चांगल्या प्रकारच्या सुविधा देण्यात येत आहेत. काम थांबवण्यासंदर्भात दाखल केलेली याचिका खोट्या दाव्यांवर करण्यात आली आहे, असे केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयाला सुनावणीवेळी सांगितले. 

जबरदस्त इलेक्ट्रिक कार येतेय, सिंगल चार्जवर २०० किमी धावणार; किंमत केवळ ४.३ लाख

दरम्यान, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन अशा देशातल्या एकूण १२ पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी संयुक्तपणे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये राजधानी दिल्लीमधील सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प, नागरिकांसाठी मोफत लसीकरण, केंद्र सरकारने पारित केलेले ३ कृषी कायदे अशा एकूण ९ मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे. दिल्लीतील सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प तातडीने थांबवण्यात यावा आणि त्यासाठी देण्यात आलेला निधी ऑक्सिजन आणि लसींचा साठा मिळवण्यासाठी वापरावा, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.
 

Web Title: thomas isaac says Wake up PM and use vista money for vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.