शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

‘त्या’ न्यायमूर्तींना सेवेत कायम करणार नाही!, सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 7:44 AM

Court News : पोक्सो कायद्यांतर्गत बालिकांवरील लैंगिक अत्याचारासंदर्भातील दोन वादग्रस्त निर्णयांनतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला यांची पदावर कायम करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने मागे घेतली आहे.

नागपूर : पोक्सो कायद्यांतर्गत बालिकांवरील लैंगिक अत्याचारासंदर्भातील दोन वादग्रस्त निर्णयांनतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला यांची पदावर कायम करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने मागे घेतली आहे. न्यायपालिकेच्या इतिहासात असे पहिल्यांदा घडल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.न्या.गणेडीवाला यांची सेवेची दोन वर्षे संपत आल्यामुळे त्यांना कायम करणारा निर्णय अपेक्षित होता. त्यानुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने त्यांना न्यायमूर्ती पदावर कायम करण्याची शिफारस केली होती. मात्र, वादग्रस्त निकालांमुळे दहाच दिवसांत ही  

शिफारस मागे घेण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय कॉलेजियमध्ये सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे तसेच न्या. एन. व्ही. रामण्णा व न्या. आर. एफ. नरीमन यांचा समावेश आहे.

कोण आहेत न्या. पुष्पा गणेडीवाला?न्या. पुष्पा विरेंद्र गणेडीवाला यांचा जन्म ११ मार्च १९६९ रोजी अमरावती जिल्ह्यात परतवाडा येथे झाला. संपूर्ण शैक्षणिक प्रवासात अत्यंत हुशार अशी त्यांची ओळख होती. बी.कॉम., एलएल.बी. व एलएल.एम. परीक्षेत त्यांनी सुवर्णपदक पटकावले. पहिल्याच प्रयत्नात नेट-सेट परीक्षासुद्धा उत्तीर्ण केली. त्यानंतर अमरावती जिल्हा न्यायालयात त्यांनी वकिली सुरू केली. विविध बँका व विमा कंपन्यांसाठी वकिलांच्या पॅनलच्या त्या सदस्य होत्या. अमरावतीच्या विद्यापीठातील विविध एमबीए व एलएलएम महाविद्यालयात त्यांनी अध्यापनही केले. २००७ मध्ये त्यांची जिल्हा न्यायाधीश म्हणून थेट नियुक्ती झाली. मुंबईत शहर दिवाणी न्यायाधीश, तसेच नागपूर जिल्हा न्यायालय, कुटुंब न्यायालयात त्यांनी काम केले. याशिवाय महाराष्ट न्यायाधिकरण अकादमीच्या सहसंचालक, जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीश म्हणूनही उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर १३ फेब्रुवारी २०१९ ला मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून त्यांची पदोन्नती झाली. न्या. गणेडीवालांचे वादग्रस्त निकालपॉक्सो अ‍ॅक्ट प्रकरणातील दोन निर्णय न्या.गणेडीवाला यांना भोवले. एका प्रकरणात १२ वर्षीय मुलीच्या छातीला स्पर्श करणाऱ्या आरोपीची पॉक्सोमधील शिक्षा विनयभंगाच्या कलमाखाली बदलताना, प्रत्यक्ष त्वचेला स्पर्श होत नसेल व अल्पवयीन मुलीला केवळ कपड्यावरून स्पर्श होत असेल, तर तो लैंगिक अत्याचार होत नाही, असा निकाल दिला.  दुसऱ्या एका निकालात न्या. गणेडीवाला यांनी, मुलीचा हात धरणे व पँटची झिप उघडणे म्हणजे लैंगिक अत्याचार होत नाही, असे मत नोंदवून आरोपीने भोगलेली शिक्षा पुरेसी असल्याचा निवाडा दिला.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय