शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

आंदोलने भडकावणाऱ्यांनी कायदा समजून घ्यावा, काँग्रेसला अप्रत्यक्ष टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 6:51 AM

उद्धव ठाकरे : काँग्रेसला अप्रत्यक्ष सल्ला; पंतप्रधानांची घेतली भेट

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरूस्ती कायदा, एनपीआर (राष्ट्रीय जनगणना) यांच्याविरोधात आंदोलने भडकवणाऱ्यांनी आधी कायदा समजून घ्यावा, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसला सल्ला दिला. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तासभर चाललेल्या बैठकीत महाराष्ट्राचे प्रश्न व महाविकास आघाडीमुळे बदललेल्या राजकारणावर त्यांच्यात चर्चा झाली. मतभेद दूर ठेवून महाराष्ट्राला मदत करण्याची ग्वाही पंतप्रधानांनी दिल्याचे ठाकरे म्हणाले.

देशभर नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात आंदोलन पेटले असताना ठाकरे यांनी मात्र केंद्र सरकारचे समर्थन केले. उद्धव ठाकरे म्हणाले की, मी सीएए, एनपीआर समजून घेतले आहे. त्यामुळे कुणाचेही नागरिकत्व जाणार नाही. केंद्राने प्रसिद्ध केलेली प्रश्नोत्तरेही तपासली. त्यामुळे ज्यांनी आंदोलन भडकावले त्यांनी ते समजून घ्यावे. त्यानंतरच मत बनवावे. मात्र राज्यातील महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाही, सरकार पाच वर्षे पूर्ण करेल.राज्याच्या प्रश्नांवर चर्चापीक वीमा योजनेची अंमलबजावणी राज्यात नीट होत नसल्याचे आपण पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, १0 जिल्ह्यांतच शेतकºयांना या योजनेचा लाभ झाला आहे. जीएसटीची भरपाईही महाराष्ट्राला मिळणे बाकी आहे.पत्र लिहिल्यानंतर थोडा वाटा राज्याला मिळाला. यापुढे तो मिळेल, अशी आशा आहे. काही निर्णयांत राज्यपाल अडथळे आणत आहेत, असे विचारता ते म्हणाले की, हा अडवणुकीचा प्रकार नाही. यास केंद्र-राज्य संघर्ष असेही स्वरूप नाही.अडवाणी, सोनिया यांच्याशीही चर्चामुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संध्याकाळी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी व भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ते गृहमंत्री अमित शहा यांनाही भेटायला गेले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीShiv SenaशिवसेनाSonia Gandhiसोनिया गांधीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक