शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
2
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
3
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
4
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
5
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
6
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
7
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
8
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
9
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
10
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
12
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
13
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
14
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
15
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
16
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
17
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?
18
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
19
इस्रायलने आपल्या आणखी एका शत्रूचा केला खात्मा, हमास कमांडर फतेह शेरीफ ठार
20
“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर

‘त्या’ दोन भगिनींचा प्रजासत्ताकदिनी गौरव

By admin | Published: December 01, 2014 11:55 PM

रोहतक येथे हरियाणा रोडवेजच्या बसमध्ये छेड काढणाऱ्या तीन मजनूंना चोप देणाऱ्या दोन भगिनींचा गणराज्यदिनी गौरव केला जाणार आहे

चंदीगड : रोहतक येथे हरियाणा रोडवेजच्या बसमध्ये छेड काढणाऱ्या तीन मजनूंना चोप देणाऱ्या दोन भगिनींचा गणराज्यदिनी गौरव केला जाणार आहे. या घटनेत बघ्याची भूमिका घेणारा बसचालक व वाहक यांना निलंबित करण्यात आले आहे.राज्य परिवहन मंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेची खातरजमा केली जावी, असा आदेश हरियाणा सरकारने पोलीस महासंचालक आणि वाहतूक विभागाला दिला आहे. महाविद्यालयात शिकणाऱ्या या दोन भगिनींनी दाखविलेल्या धाडसाबद्दल त्यांचा प्रजासत्ताकदिनी रोख रक्कम देऊन सत्कार केला जाईल, असे हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी सांगितले. या दोन भगिनी बसमधून प्रवास करीत असताना तीन तरुणांनी त्यांची छेड काढली होती. त्यावेळी अन्य प्रवासी केवळ बघ्याची भूमिका बजावत होते. त्यापैकी एकीने युवकांना बेल्टने चोप दिला. एका प्रवाशाने मोबाईल फोनवर ही घटना रेकॉर्ड केल्यानंतर सोशल मीडियावर ती व्हायरल झाली. कुलदीप, मोहित आणि दीपक असे नाव असलेल्या या तीन तरुणांना अटक करण्यात आली असून, ६ डिसेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष ललिता कुमारमंगलम यांनी या दोन बहिणींचे अभिनंदन करताना छेडखानी करणाऱ्या लोकांना सामोरे जाण्याचे धाडस काही मुलींमध्येच असते, असे म्हटले. (वृत्तसंस्था)