Meghalaya Governor Satya Pal Malik on Farmers Protest: मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी रविवारी देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचं समर्थन केलं. ते जयपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाला संबोधित करत होते. "शेतकरी आंदोलनात ज्यांता मृत्यू झाला त्यांच्याबद्दत ते (नेते) काही बोलले नाहीत. मी यापूर्वीही सांगितलंय की शेतकऱ्यांच्या आंदोलन स्थळीही येऊन बसेन," असं सत्यपाल मलिक म्हणाले.
"शेतकऱ्यांचे जे मुद्दे आहेत, जर त्यावर मी काही वक्तव्य केलं तर त्यावर वाद होतील. राज्यपालांना हटवलं जाऊ शकत नाही, परंतु माझे काही शुभचिंतक आहेत, जे याच शोधात असतात की मी काही बोलेन आणि हटवलं जाईल," असंही मलिक यांनी नमूद केलं. "मला दोन तीन जणांनी राज्यपाल बनवलं आहे. शेतकऱ्यांच्या बाजूनं बोलल्यास त्यांना समस्या निर्माण होतील, मला याचा अंदाज आहे. परंतु जर त्यांनी काही समस्या आहेत असं सांगितलं तर पद सोडण्यासाठी मी एक मिनिटही वाया घालवणार नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलं.
यापूर्वीही शेतकऱ्यांचं केलं समर्थनयापूर्वीही सत्यपाल मलिक यांनी शेतकऱ्यांचं खुलेपणानं समर्थन केलं होतं. त्यांनी इंडिया टुडेचे कन्सल्टिंग एडिटर राजदीप सरदेसाई यांच्याशी साधलेल्या संवादादरम्यान ३ कृषी कायद्यांविरोधात खुलेपणे शेतकऱ्यांचं समर्थन केलं होतं. आदोलनाच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संवाद साधला असून त्यांच्या मागण्या मान्य करण्याची मागणी केल्याचंही ते यावेळी म्हणाले होते.