शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

अपघातग्रस्तांच्या मदतीऐवजी बघ्याची भूमिका घेऊन व्हिडीओ बनवणाऱ्यांवर होणार कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2019 12:06 PM

माणुसकीला काळिमा फासणाऱ्या अशा घटनांवर पोलिसांनीही जरब बसवण्यासाठी आता प्रयत्न सुरू केले आहे.

नवी दिल्लीः रस्ते अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला मदत करण्याऐवजी बरेच लोक त्याचा व्हिडीओ बनवण्यात धन्यता मानतात. अशा प्रकारच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या अशा घटनांवर पोलिसांनीही जरब बसवण्यासाठी आता प्रयत्न सुरू केले आहे. अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीला अपघात झाला असेल आणि तिला मदत करण्याऐवजी इतर व्यक्तीनं तिचा व्हिडीओ बनवल्यास पोलीस त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करणार आहे.गौतम बुद्धनगरमध्ये ट्रॅफिक पोलिसांनी अशा प्रकारचा गुन्हा नोंदवता येऊ शकतो का, याची चाचपणी केली. यासाठी ट्रॅफिक पोलीस सीसीटीव्ही फुटेजचीही मदत घेणार असून, अशा प्रकारे कोणताही वाहन चालक दुसऱ्या अपघातग्रस्त व्यक्तीचा व्हिडीओ बनवत असल्याचं निदर्शनास आल्यास त्या वाहन चालकाची ओळख पटवली जाणार आहे. नंतर त्या वाहन चालकांवर मोटार वाहन अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. रस्त्यावरील अशा बऱ्याच अपघातात रुग्णांना वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अपघात झाल्यानंतर उपस्थित लोक फक्त बघ्याची भूमिका घेतात किंवा व्हिडीओ काढण्यात मश्गुल असतात. त्या अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी कोणीही पुढे जात नाही किंवा त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करत नाहीत. त्यामुळे जास्त करून जखमी व्यक्तीचा मृत्यू होतो.नोएडा -ग्रेटर नोएडा एक्स्प्रेस वे आणि यमुना एक्स्प्रेस वेवर असे प्रकार करणाऱ्यांविरोधात ट्रॅफिक पोलिसांनी कडक पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे. रस्त्यात अपघात झाल्यानंतर वाहन थांबवून उभं राहणं किंवा मोबाइलवर त्याचं चित्रीकरण करणाऱ्या लोकांवर मोटार वाहन अधिनियम कलम 122 आणि 177अंतर्गत कारवाई करण्यात येणार असून, गुन्हा दाखल केला जाणार आहे. असे प्रकार करताना कोणी आढळल्यास त्याला तुरुंगवासही भोगावा लागू शकतो.