हिंदूंना धमकावणाऱ्या लोकांना पाकिस्तानात पाठवलं जाईल- बी. गोपालकृष्णन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 10:34 AM2019-12-27T10:34:42+5:302019-12-27T10:58:16+5:30
काही लोक मध्यपूर्वेतील हिंदूंना नागरिकत्व कायद्याल समर्थन केल्यामुळे घाबरवले जात आहे.
नवी दिल्ली: नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीला समर्थन करणाऱ्या आखाती देशातील हिंदूना काही लोकं घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. हिंदूंना घाबरवाणाऱ्या आणि धमकावणाऱ्या लोकांना पाकिस्तानात पाठवलं जाईल असं विधान भाजपाचे नेते बी. गोपालकृष्णन यांनी केलं आहे.
बी. गोपालकृष्णन म्हणाले की, इंडियन यूनियन मुस्लीम लीगने (आययूएमएलन) धार्मिक घटकांना दूर केलं आहे. मात्र तरीदेखील काही लोक मध्यपूर्वेतील हिंदूंना नागरिकत्व कायद्याल समर्थन केल्यामुळे घाबरवले जात आहे. जे निरपराध हिंदूंना घाबरवत तसेच धमकावतात आहेत त्यांना पाकिस्तानात पाठवलं जाईल असं वक्तव्य बी. गोपालकृष्णन यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केलं आहे.
केरळ सरकारने एनपीआरच्या प्रक्रियेला स्थगिती देण्याच्या निर्णयावर बी. गोपालकृष्णन यांनी नाराजी व्यक्त केली. प्रत्येकाला देशात लागू केलेल्या सर्व कायद्यांचे पालन करण्याचे बंधन आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पी विजयन यांनी लवकरात लवकर एनपीआर प्रक्रिया सुरु करावी अन्यथा सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत राज्याला दिले जाणारे रेशन बंद होईल असं देखील बी. गोपालकृष्णन यांनी यावेळी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखालील कॅबिनेटनं राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीला मंजुरी दिली होती. मात्र पश्चिम बंगाल आणि केरळ सरकारनं एनपीआरला त्यांचा विरोध असेल, हे आधीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीवरुन वादंग माजला असताना मोदी सरकार संपूर्ण देशात एनपीआर कसं राबवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.