शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
2
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
3
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
4
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
5
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
6
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
7
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
8
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
9
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
10
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
11
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
12
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
13
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
14
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
15
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
16
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
17
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
18
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
19
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
20
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  

पाच राज्यांतील हजारो जाट राजधानीत दाखल

By admin | Published: March 03, 2017 4:37 AM

हरियानात सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी उत्तर प्रदेश, हरयाणा, राजस्थान, पंजाब, उत्तराखंड या पाच राज्यांतील हजारो जाट लोक येथील जंतरमंतरवर आले

नवी दिल्ली : सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांत जाट समाजाला राखीव जागा द्याव्यात या मागणीसाठी हरियानात सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी उत्तर प्रदेश, हरयाणा, राजस्थान, पंजाब, उत्तराखंड या पाच राज्यांतील हजारो जाट लोक येथील जंतरमंतरवर आले असून, तिथे त्यांचे धरणे आंदोलन सुरू आहे.नवी दिल्लीतील जंतरमंतर भागाकडे जाणारे सर्व रस्ते उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, हरियाना व पंजाबमधून आलेल्या आंदोलकांमुळे बंद पडले व वाहनचालकांची व प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. आंदोलकांना जंतरमंतरपर्यंत जाता यावे यासाठी वाहतूक आणि पोलीस कर्मचारी ठराविक ठिकाणी व्यवस्था बघत होते. हरियानात सध्या सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी जंतरमंतरवर ‘जाट न्याय धरणे’ आंदोलन करण्यात आले, असे अखिल भारतीय जाट आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष यशपाल मलिक यांनी सांगितले. हे आंदोलन या समितीमार्फत चालवले जात आहे. जाटांचे शिष्टमंडळ राखीव जागांच्या मागणीबाबतचे निवेदन राष्ट्रपती व पंतप्रधानांना सादर करील व संसदेवर मोर्चा काढण्यात येईल, असे मलिक म्हणाले. जाटांची आम्हाला इतर मागासवर्ग (ओबीसी) गटातून सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांत राखीव जागा मिळाव्यात अशी मागणी आहे. या मागणीसह गेल्या वर्षी याच मागणीसाठी हरियानात झालेल्या आंदोलनातून तुरुंगात असलेल्यांची सुटका करावी, आंदोलनात दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत आणि आंदोलनात ठार झालेल्यांच्या नातेवाईकांना तसेच जखमी झालेल्यांना सरकारी नोकरी द्यावी, अशीही मागणी आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>५0 लाखांचा मोर्चा?गेल्या वर्षी हरियानात झालेले हे आंदोलन हिंसक बनले होते व त्यात ३० जण ठार व कोट्यवधी रुपयांची मालमत्ता नष्ट झाली होती.त्या आंदोलनाच्या काळात काही महिलांवर बलात्कार व अत्याचार झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्याची चौकशी सध्या सुरू आहे. मागण्या मान्य न झाल्यास ५0 लाख जाट दिल्लीत आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे.