नवी दिल्ली : हजार रुपयांची नवी नोट चलनात आणण्याची योजना रिझर्व्ह बँकेने आखली आहे. या नोटेचा मुहूर्त ठरला नसला तरी ती लवकरच आणली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर रोजी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. त्यानंतर सरकारने लगेच दोन हजारांची नोट चलनात आणली. लगोलग पाचशे रुपयांन्ची नवी नोटही आणण्यात आली. एक हजार रुपयांची नोट आणण्याबाबत मात्र कोणत्याही हालचाली झाल्या नव्हत्या; मात्र आता ही नोट आणण्यात येत आहे. सरकारी सूत्रांनी सांगितले की, रिझर्व्ह बँकेने हजारांच्या नव्या नोटेची छपाई यापूर्वीच सुरू केली आहे. वास्तविक जानेवारी महिन्यातच ही नोट चलनात आणण्याची सरकारची योजना होती. तथापि, त्यावेळी पाचशेच्या नोटांची मागणी बाजारात जास्त होती. त्यामुळे हजारांच्या नोटा छापण्याऐवजी पाचशेच्या नोटा छापण्यास सरकारने प्राधान्य दिले. आता हजारांच्या नोटांची छपाई सुरू झाली आहे. तथापि, या नोटा नेमक्या केव्हा बाजारात आणणार याचा निर्णय अद्याप झालेला नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)50 हजारांपर्यंत काढा रक्कम २0 फेब्रुवारीपासून बँकांच्या सेव्हिंग्ज खात्यातून पैसे काढण्याची साप्ताहिक मर्यादा ५0 हजारांपर्यंत वाढविण्यात आली आहे. आधी ही मर्यादा २४ हजार रुपये होते. १३ मार्चनंतर पैसे काढण्यावरील सर्व मर्यादा हटविण्यात येणार आहेत.
हजारची नवी नोट लवकरच येणार
By admin | Published: February 22, 2017 4:30 AM