हैदराबाद : चोरीला गेलेले किंवा गहाळ झालेले मोबाइल फोन शोधण्यासाठी भारत सरकारच्या दूरसंचार खात्याने १९ एप्रिल २०२३ रोजी सेंट्रल इक्विपमेन्ट आयडेंटिटी रजिस्टर (सीईआयआर) हे पोर्टल आधी तेलंगणात प्रायोगिक तत्त्वावर व मग १७ मे २०२३ पासून सर्व देशभरात अधिकृतपणे सुरू केले. त्यानंतर आतापर्यंत असे ३०,०४९ मोबाइल फोन तेलंगणा पोलिसांनी शोधून काढले आहेत.
तेलंगणामध्ये अतिरिक्त डीजीपी (सीआयडी) यांची सीईआयआर पोर्टलसाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तत्कालीन एडीजी महेश भागवत हे या पोर्टलचे तेलंगणातील पहिले राज्यस्तरीय नोडल अधिकारी होते. त्यांनी तेलंगणात व अन्य राज्यांमध्येही गहाळ, चोरीला गेलेल्या मोबाइलचा शोध घेऊन ते परत मिळविले. सध्या अतिरिक्त डीजीपी (सीआयडी) शिखा गोयल या तेलंगणात सीइआयआर पोर्टलअंतर्गत होणाऱ्या कामावर देखरेख ठेवतात. (वृत्तसंस्था)
महाराष्ट्र चौथ्या स्थानी - चोरीस गेलेल्या, गहाळ झालेले मोबाइल सीईआयआरच्या मदतीने कोणी किती शोधून काढले?