शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
4
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
5
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
6
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
7
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
8
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
9
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
11
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
12
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
15
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
16
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
17
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
18
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
19
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड

औषध कंपन्यांकडून हजारो कोटींची करचोरी

By admin | Published: March 07, 2017 3:45 AM

मोदी सरकारने नियंत्रण आणण्यास सुरुवात केलेली असली तरी औषध निर्मात्या कंपन्या हजारो कोटी रुपयांची करचोरी करीत आहेत

नितीन अग्रवाल,नवी दिल्ली- औषधांच्या अव्वाच्या सव्वा किमतीवर मोदी सरकारने नियंत्रण आणण्यास सुरुवात केलेली असली तरी औषध निर्मात्या कंपन्या हजारो कोटी रुपयांची करचोरी करीत आहेत. या कंपन्या सेवा कर आणि केंद्रीय उत्पादन शुल्क सरकारकडे जमा करण्यात बरीच गडबड करीत आहेत. सरकार आता अशा कंपन्यांभोवती फास आवळायला सुरुवात करीत आहे.अर्थ मंत्रालयातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार औषध निर्मात्या कंपन्यांतील हिशेब पुस्तकातील करचोऱ्या उघडकीस आल्या असून त्या पकडल्या गेल्या आहेत. गेल्या चार वर्षांत उत्पादन शुल्कात १७,३५८ कोटी रुपयांचा घोटाळा केलेली ८२६८ प्रकरणे उघडकीस आली. यातील ६,१२३ प्रकरणांत सुमारे २५४० कोटी रुपये वसूल झाले आहेत. याच प्रकारे सेवा करात घोटाळे केल्याची २७९२४ प्रकरणे उघडकीस आली. त्यात ५२,३८८ कोटी रुपयांची कर अनियमितता होती. यात १६,५४३ कोटी रुपये वसूल करण्यात आले.उत्पादन शुल्कातील अनियमिततेची सगळ््यात जास्त २६०६ प्रकरणे २०१३-२०१४ वर्षात पकडली गेली. त्याच वर्षी सेवा करातील अनियमिततेची सगळ््यात जास्त घटनांची (९२१५) माहिती समजली. तथापि, रकमेच्या बाबतीत विचार केला तर उत्पादन शुल्कचे ५२९७ कोटी रुपये आणि सेवा कराचे १८,९७० कोटी रुपयांचे सगळ््यात जास्त घोटाळे २०१५-२०१६ या वर्षात उघडकीस आले. सूत्रांच्या अनुमानानुसार सरकारने करचोरी करणाऱ्या कंपन्यांकडून प्रत्येक रुपया वसूल करण्याची कारवाई सुरू केली आहे. सरकारकडून या कंपन्यांना नोटीस पाठवणे सुरू झालेले आहे व कठोर कायदेशीर कारवाईदेखील केली जात आहे. योग्य तो कर जमा न करणाऱ्या कंपन्यांना मोठा आर्थिक दंड ठोठावला जाईल, असे सांगितले जात आहे.सेवा कर जमा करण्यात ५२,३८८ कोटी रुपयांचा घोटाळाउत्पादन शुल्कात १७,३५८ कोटी रुपयांचा गैरव्यवहार२०१३-२०१४ वर्षात अनियमिततेची सगळ्यात जास्त प्रकरणे२०१५-२०१६ मध्ये सगळ्यात मोठ्या रकमेच्या अनियमितता>आॅक्टोबर २०१६ पर्यंत>उत्पादन शुल्क 2990 कोटींचा घोटाळा1173 प्रकरणे उघडकीस>सेवा कर9031 कोटींचा घोटाळा4456 प्रकरणे उघडकीस>७८२ प्रकरणात ३७७ कोटी रुपये आणि सेवा कराच्या ४३२ प्रकरणात २३३४ कोटी रुपये वसूल