युक्रेन युद्धामध्ये ज्या अमेरिकेच्या स्टिंगर मिसाईलने रशियन फौजांची दाणादाण उडविली ते मिसाईल भारतात येऊन पोहोचल्याचा अलर्ट जारी करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. हे असे मिसाईल आहे, जे लक्ष्याचा अचूक भेद घेते, यामुळे देशातील मोठमोठे नेते या दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज बिहारच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
अमित शहा यांच्या बिहार दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पटना ते चंपारण पर्यंत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. बिहारचे पोलिस महानिरीक्षकांनी सर्व डीएम, एसएसपी आणि एसपींना पत्र पाठविले आहे. बिहारमधील दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांकडे स्टिंगर मिसाईल आहे, यामुळे खास व्यक्तींच्या जीवाला धेका आहे. यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे.
या पत्रात महाबोधी मंदिरात स्फोटके जप्त केल्याप्रकरणी फरार दहशतवाद्यांवर आवश्यक ती कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे. या अलर्टमुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यात सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने बदल होण्याची शक्यता आहे.
छपराच्या मरहौरामध्ये लष्कर-ए-मुस्तफाच्या कमांडरला शस्त्रे पाठवल्याची कबुली स्फोट प्रकरणातील आरोपी जावेद आलम याने दिली आहे. यामध्ये त्याने स्टिंगर मिसाईलही असण्याची शक्यता आहे. या अलर्टमध्ये हेलिपॅडबाबतही चर्चा करण्यात आली असून ते मानकांनुसार बनवावेत, असे सांगण्यात आले आहे. दहशतवाद्यांकडे रॉकेट स्टिंगर मिसाईल असल्याच्या वृत्तानंतर धोका वाढणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. यामुळे हेलिपॅड परिसरात पोलिसांची सतत गस्त राहणार आहे. याबाबतचे वृत्त एनबीटीने दिले आहे.
स्टिंगर मिसाइल्सरशियाच्या विरोधात यावेळी यूक्रेन सर्वात जास्त स्टिंगर मिसाइल्सचा वापर करत आहे. ही तीच मिसाइल आहे जी अनेक वर्षापूर्वी अफगाणिस्तानच्या धरतीवर वापरण्यात आली होती. तेव्हाही सोव्हिएत संघाच्या सैन्याला हार पत्करावा लागली होती. याचं कारण होतं ती स्टिंगर मिसाइल्स, या मिसाइलची खासियत सांगायचं झालं तर कमी उंचीवरील कुठल्या लढाऊ विमानाला उद्ध्वस्त करण्याची क्षमता आहे. एकाच हल्ल्यात विमान पाडलं जाऊ शकतं.या मिसाइल्सचा वापर करण्यासाठी जादा सैन्याची आवश्यकता नसते. कुणीही खांद्यावर ठेऊन ती उडवू शकतो. ही स्टिंगर मिसाइल अमेरिकेचा अविष्कार आहे. अमेरिकेन सैन्यामध्ये स्टिंगर मिसाइल्सचा सर्वाधिक वापर होतो. परंतु रशिया-यूक्रेन लढाईत हीच स्टिंगर मिसाइल यूक्रेन सैन्यासाठी मोठी ताकद बनली आहे.